Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. MCX वर सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. चांदी 425 रुपयांनी महाग झाली असून 95,155 रुपयांवर प्रति किलो भावाने विक्री होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि सराफा बाजारात सोन्याचे भाव कसे आहेत, जाणून घ्या.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ लावल्यानंतर ट्रेड वॉरमध्ये डॉलरच्या पडझडीनंतर आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीनंतर मंगळवारी सोन्याच्या दरात उसळी आली होती. स्पॉट गोल्ड 0.7 टक्क्यांनी वाढून 2,914 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. यावर्षात बुलियनमध्ये 11 टक्क्याहून अधिक तेजी आली आहे. 24 फ्रेबुवारी रोजी 2,956.15 डॉलरने उच्चांकी दर गाठले होते. यू.एस गोल्ड फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी वाढून 2,925 डॉलरवर पोहोचला होता.
सराफा बाजारात सोन्याचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 600 रुपयांनी वाढले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 87,980 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याचे दर लवकरच 90 हजारांचा भाव गाठू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 80,650 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 87,980 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 65,990रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,065 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,798 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,599 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 64,520 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 70,384 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 52,792 रुपये
22 कॅरेट- 80,650 रुपये
24 कॅरेट- 87,980 रुपये
18 कॅरेट- 65,990रुपये