Gold Rate Today: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत सध्या तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीत सोन्याच्या दरातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले होते. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे दर सातत्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. आजदेखील सोन्याचे दर वाढले असून लवकरच सोनं एक लाखांवर जाण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर काय आहेत.
गेल्या महिन्यात 22 एप्रिलला प्रतितोळा सोन्याची किंमत 1 लाखांवर पोहोचली होती. वर्षाच्या शेवटी सोन्याचे दर प्रतितोळा 1.10 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा जाणकारांचा कयास आहे. अमेरिका-चीन यांच्यातील वाढलेले टैरिफ वॉर आणि आणि मंदीच्या शक्यतांमुळे त्या काळात सोन्याची किंमत वाढली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर लाखापार जाण्याची शक्यता आहे. आज 24 कॅरेट सोनं 99,600 रुपयांवर पोहोचले आहे. आज 600 रुपयांनी सोनं महागलं आहे.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 91,300 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची वाढ झाली असून 74,700 रुपयांवर पोहोचले आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 99,600 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, गुंतवणुकदारांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 91,300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 99,680 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 74,700 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,130 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,960 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,470 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 73,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 79,680 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59,760 रुपये
22 कॅरेट- 91,300 रुपये
24 कॅरेट- 99,680 रुपये
18 कॅरेट- 74,700 रुपये