Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत असताना आज सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. सलग पाचव्या दिवशी झालेल्या घसरणीनंतर आज दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं आहे. कालच्या तुलनेत सोनं फक्त 10 रुपयांनी महागलं आहे. देशातील बहुतांश बागात सोन्याचा भाव 90,400 रुपयांवर आहे. तर चांदीचा भाव 92,900 रुपये इतका आहे. आज गुरुवारी सोनं-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊया.
गुरुवारी 10 एप्रिल 2025 रोजी चांदीचा दर 92,900 रुपये इतका आहे. चांदीचे भाव कालच्या तुलनेत आज 100 रुपयांची घसरण झाली आहे.
गुरुवारी 10 एप्रिल 2025 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 83,060 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 90,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोनं 82,910 रुपये आणि 24 कॅरेट सोनं 90,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.
अमेरिका-चीनच्या वाढत्या टॅरिफ वॉरमुळं गेल्या काहि दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घट होत आहे. मात्र आत आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. ज्याचा परिणाम भारताच्या बाजारपेठेवर होताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं $3163ने घट होऊन $3100 प्रति ग्रॅमवर आलं आहे. भारतात सोन्याच्या किंमती रोज बदलतात. ग्लोबल रेट, टॅक्स, इम्पोर्ट ड्युटी आणि रुपयांच्या किंमतीवर आधारित आहे.
भारतात सोन्याच्या किंमतीत अनेकवेळा बदलत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, सरकारचे कर आणि रुपयांची किंमतीत चढ-उतार होऊ शकतो. सोन्याच्या किंमतीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरते.