Marathi News> भारत
Advertisement

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; चांदीची चमकही वाढली

 आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरांनी उसळी घेतली होती. तोच ट्रेंड आजही पाहायला मिळाला आहे. 

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; चांदीची चमकही वाढली

मुंबई :  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरांनी उसळी घेतली होती. तोच ट्रेंड आजही पाहायला मिळाला आहे. आजही मुंबईतील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. म्हणजेच दोन दिवसात सोन्याच्या दरात 400 रुपये प्रति तोळे पेक्षाही अधिक वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीही कुठे मागे राहणार आहे. मुंबईतील चांदच्या दरात तब्बल 2500 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. 

त्यापार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये झालेल्या वाढीचा परिणामही भारतीय बाजारावर दिसून येतो. असे असले तरी MCXमध्ये सोने आणि चांदीच्या दरात आज फारसा बदल झालेला नाही.

मुंबईतील आजच्या सोन्याचा दर

22 कॅरेट  44570 प्रति तोळे (+210)
24 कॅरेट  45570 प्रति तोळे (+210)

मुंबईतील चांदीचे दर
चांदी  70000 प्रति किलो

----------------------------------

(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)

Read More