Marathi News> भारत
Advertisement

लग्नसराईच्या दिवसांतच ग्राहकांना दिलासा; पंधरा दिवसांत सोनं 5 हजारांनी स्वस्त, चांदीही घसरली

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. त्यामुळं आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या प्रतितोळा सोन्याचे दर   

लग्नसराईच्या दिवसांतच ग्राहकांना दिलासा; पंधरा दिवसांत सोनं 5 हजारांनी स्वस्त, चांदीही घसरली

Gold Price Today: दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून दोन्ही मौल्यवान धातुंमध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. दिवाळीत सोन्याच्या दरातने उच्चांक गाठला होता. मात्र, आता सोनं जवळपास 5 हजाराने स्वस्त झाले आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका झाल्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये तेजी आली होती. त्यानंतर वायदे बाजारात मात्र सोन्याच्या दरात घट झाली आहे. सराफा बाजारात आज दोन्ही मौल्यवान धातुंच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळतेय. 

वायदे बाजारात आज MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर 82 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर 74,072 रुपये प्रति 10 ग्रॅमवर येऊन पोहोचले आहेत. तर, गुरुवारी 74,154 वर सोनं स्थिरावलं होतं. आज चांदीच्या दरात 304 रुपयांची घट झाली आहे त्यामुळं सोनं 88,893 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार स्थिर झाला होता. तर, मागील व्यवहार 89,197 रुपयांनी 0.34 टक्के घसरला आहे. 

वायदे बाजारातील भाव पाहिल्यास सोनं ऑक्टोबर महिन्यात 79,500 रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. त्यानंतर आता सोनं जवळपास 5,600 रुपयांपेक्षा अधिक घसरले आहे. चांदी ऑक्टोबरमध्ये 1,00,564 रुपयांच्या उच्चांकीवर असताना या तुलनेत MCXवर चांदीचे दर 11,600 रुपयांपर्यंत घसरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमजोर मागणीमुळं राष्ट्रीय राजधानी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झाली आहे. 

दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. पंधरा दिवसांत दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५,७०० रुपयांनी कमी होऊन गुरुवारी ७४,५०० रुपये आणि चांदीचे दर तब्बल ११ हजार रुपयांनी उतरून ८९ हजार रुपयांवर स्थिरावले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने ९०० रुपये व चांदीचे दर १,८०० रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील तेजीमुळे दर घसरल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. 

Read More