Gold And Silver Price: आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ झाली आहे. मिडल ईस्टमधील वाढत्या तणाव आणि कमजोर डॉलर यामुळं पुन्हा सोन्याची चमक वाढली आहे. त्याव्यतिरिक्त अमेरिकेतील महागाई अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड 0.7% वाढून $3,365 प्रति औंस झाले. दरम्यान, अमेरिकन सोन्याचे वायदे 1.5% वाढून $3,395वर व्यवहार करत होते. तर अमेरिकन डॉलर इंडेक्स जवळपास दोन महिन्याच्या निच्चांकीवर आले आहे.
MCXवर सराळी सव्वा दहाच्या दरम्यान गोल्ड फ्युचर 1274 रुपयांची तेजी दिसली आहे. यामुळं सोन्याचा भाव 97,978 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. काल सोन्याचा भाव 96,704 रुपयांवर बंद झाला होता. चांदी या दरम्यान 760 रुपयाच्या मोठी वाढीसह 1,06,152 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. काल 10,05,392 रुपयांवर चांदी बंद झाली होती.
आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं 880 रुपयांनी महागलं आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं 99,280 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 800 रुपयांनी महागला असून 91,000 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून सोनं 74,460 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 91,000 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 99,280 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 74, 460 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,928 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,100 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,446 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 79,424 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 72,800 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59, 568 रुपये
22 कॅरेट- 91,000 रुपये
24 कॅरेट- 99,280 रुपये
18 कॅरेट- 74, 460 रुपये