Marathi News> भारत
Advertisement

सोन्याच्या दराने घेतली पुन्हा उसळी; वाचा आजचे 18,22,24 कॅरेटचे दर

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर 

सोन्याच्या दराने घेतली पुन्हा उसळी; वाचा आजचे 18,22,24 कॅरेटचे दर

Gold And Silver Price: कमोडिटी बाजारात सोनवारी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. आज चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे तर सोन्याचे दरांनीही उसळी घेतली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या. 

स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती सतत तीन दिवस तेजीत होत्या राष्ट्रीय राजधानीत सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत 700 रुपयांची उसळी घेतली सोनं असून प्रतितोळा 82,000 रुपयांवर पोहोचलं होतं. मागील व्यवहारांत सोनं 80,900 रुपयांवर स्थिरावलं होतं. तर आज सोमवारी सोनं 120 रुपयांनी वधारलं आहे. तर, चांदीमध्येदेखील 200 रुपयांच्या तेजीसह 91,800 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहेत. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 81,230 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली असून सोनं 74,500 रुपयांवर स्थिरावले आहे. तर , 18 कॅरेट सोन्याच्या दरात 170 रुपयांची वाढ झाली असून सोनं 61,000 रुपयांवर पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  74, 500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  81, 230 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  61,000 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,450 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,123 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 100 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   59,600रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   64,984रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    48,800 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 74, 500 रुपये
24 कॅरेट-  81, 230 रुपये
18 कॅरेट- 61,000 रुपये

Read More