Marathi News> भारत
Advertisement

Gold Price : सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक! 10 ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करण्याची कल्पना असेल, तर आज सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. जाणून घ्या आजचे दर... 

Gold Price : सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक! 10 ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Price Today on  2 April 2023 : तुम्ही जर सोने-चांदी खरेदी (Gold Price Today) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. सध्या जगभरातील बँकिंग व्यवस्थेची बिकट स्थिती आणि शेअर बाजारातील घसरणीच्या काळात सोने सातत्याने नवे उच्चांक गाठत आहे. आज सोन्याने मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये 60,000 चा टप्पा ओलांडत आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 55,000 रुपये असून मागील ह्या मौल्यवान धातूची किंमत 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होत. तर गुड रिटर्न्स  या वेबासाइटनुसार चांदी 74,500 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. 

दरम्यान सोन्याच्या किंमतीत वाढीमागे अमेरिकेसह जगातील इतर देशातील बँकींग सेक्टरमधील संकट हे आहे. अमेरिकेसह युरोपातल बँक धडाधड कोसळत आहेत. त्याच्या फायदा सोन्यासह चांदीला होत आहे. परिणामी शेअर बाजारात अनिश्चितता आहे. शेअर बाजारा घसरणीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे सोने वधारले असून यापूर्वीच्या आठवड्यात 55,000 रुपयांच्या जवळपास सोने व्यापार करत होते. त्यातच आता एक तोळा सोने 60 हजार रुपयांना झाले आहेत. 

वाचा: Petrol Diesel च्या दराबाबत मोठी अपडेट, 'या' शहरात पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर 

प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर 

रविवारी (2 एप्रिल, 2023) भारतात सोन्याची किंमत 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 60,000 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 55,000 रुपये आहे. भारतात गेल्या 24 तासांत 24 कॅरेट/ 22 कॅरेटचे सोन्याचे दर सारखेच आहेत. तसेच भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आज चेन्नईमध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 55,600 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 60,650 रुपये आहे. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 60,150 रुपये आहे. तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 55,150 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 60,000 रुपये आहे. तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 55,000 रुपये आहे. दुसरीकडे, मुंबईत 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 60,000 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 55,000 रुपये आहे. भुवनेश्वरप्रमाणेच आज 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 60,000 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत आज 55,000 रुपये आहे. गेल्या 24 तासांत दर जैसे थेच आहेत.  

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.

Read More