Marathi News> भारत
Advertisement

इस्रायल युद्धाच्या आगीत सोनं-चांदी भडकली, खरेदीपुर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Gold Silver Price: भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसत आहे.

इस्रायल युद्धाच्या आगीत सोनं-चांदी भडकली, खरेदीपुर्वी जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price: देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे सराफा बाजारावर परिणाम झालेला दिसत आहे. सोन्या-चांदीच्या किमती दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने 2000 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. दिवाळीआधी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना खिसा थोडा जास्त खाली करावा लागणार आहे. 

भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसत आहे. MCX वर सोन्याचा दर सुमारे 200 रुपयांनी महागलेला दिसतो. सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 61340 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भावही 544 रुपयांनी वाढून 72261 रुपये किलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी दर 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. COMEX वर सोन्याची किंमत 2011 डॉलर प्रति ऑन झाली आहे. चांदी 1.5% च्या वाढीसह $ 23.23 प्रति ऑनवर व्यवहार करत आहे. मध्यपूर्वेतील तणावाशिवाय US FED बैठकीचा परिणाम सराफा बाजारावरही दिसून येत आहे.

Read More