Marathi News> भारत
Advertisement

Gold-Silver Price: सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजची किंमत

Gold Silver Rate: तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण आता तुमच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.  

Gold-Silver Price: सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजची किंमत

Gold Silver Price Today : लग्नसराईच्या सीजनमध्ये सोने-चांदीच्या (Gold-Silver Price) किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. जर तुमच्या कुटूंबात लग्नसराई असेल किंवा तुम्हाला सोन्या-चांदी खरेदी करायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 

दरम्यान सराफा बाजारात सोन्याच्या (Gold Rate) किमतीत वाढ झाली असून 22 कॅरेट सोने काल (13 मार्च) 53,080 प्रति 10 ग्रॅमवर ​​विकले जात होते. तर आज तेच सोने 53,380 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जाईल. दुसरीकडे जर आपण 24 कॅरेट सोन्याबद्दल बोललो तर काल (13 मार्च) सोने 55,730 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते. तर तेच सोने आज 56,050 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाईल. म्हणजेच आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

वाचा: तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा  

bankbazaar.com च्या मते गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. दोन दिवसांपासून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच जी ​​चांदी 68 हजार 700 रुपये किलो दराने विकली जात होती. ती आजही त्याच दराने विकली जात आहे. भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री केली जाते. 

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत. 

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. 

Read More