Marathi News> भारत
Advertisement

Gold Silver Rate Today | सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Rate Today | रशिया युक्रेनमधील युद्ध काहीसे थंडावल्याने आता पुन्हा सोने चांदीच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. 

Gold Silver Rate Today | सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

मुंबई : गेल्या 15 दिवसांपासून रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले होते. त्याचप्रमाणे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून येत होती. परंतू युद्ध काहीसे थंडावल्याने आता पुन्हा सोने चांदीच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आजच्या सोन्याचे भाव 53156 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे भाव 70580 रुपये प्रति किलो रुपये इतके होते. 

जळगाव येथील सुवर्ण बाजारातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजी दिसून येत होती. आज सोन्याच्या दरांमध्ये 2000 रुपये प्रति तोळे इतकी घसरण झाली आहे तर, चांदीच्या दरांमध्ये 3000 रुपये प्रति किलोने घसरण नोंदवण्यात आली आहे.

सोन्याचे दर 

मुंबई 52,580 रुपये प्रति तोळे
पुणे 52,630 रुपये प्रति तोळे
जळगाव 52200 रुपये प्रति तोळे
नागपूर 52,630 रुपये प्रति तोळे

चांदीचे दर

मुंबई  70,200  रुपये प्रति किलो
पुणे 70200 रुपये प्रति किलो
जळगाव 70000 रुपये प्रति किलो
नागपूर 70200 रुपये प्रति किलो

Read More