Marathi News> भारत
Advertisement

प्रसिद्ध गोल्फर आणि शिकारी ज्योती रंधावाला उत्तर प्रदेशात अटक

अवनी वाघिणीच्या शोधासाठीही आला होता रंधावा

प्रसिद्ध गोल्फर आणि शिकारी ज्योती रंधावाला उत्तर प्रदेशात अटक

लखनऊ : प्रसिद्ध गोल्फर आणि शिकारी ज्योती रंधावा याला उत्तर प्रदेशातील बेहराईच जिल्ह्यात शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रंधावाकडून जंगली कोंबडी आणि रानडुक्कराचं कातडं जप्त करण्यात आलं आहे. शिवाय त्याच्याकडून एक शिकारीची बंदूकही मिळाली आहे. ज्योती रंधावाला हा त्याच्या शिकारीच्या छंदासाठी प्रसिद्ध आहे. यवतमाळमध्ये अवनी वाघिणीच्या शोधासाठी रंधावा आणि त्याच्या शिकारी कुत्र्यांना घेऊन जंगलातही गेला होता. पण चार दिवस शोध घेतल्यावरही त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. गोल्फर ज्योती रंधावा सिने-अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा पूर्वपती आहे.

Read More