Marathi News> भारत
Advertisement

रात्री झोपताना 39 रुपये गुंतवले सकाळी उठल्यावर मोबाईलमध्ये आला 4 कोटींचा SMS; एका रात्रीत नशिब पलटले

एका  तरुणाचे नशिब एका रात्रीत पलटले आहे.  रात्री झोपताना ऑलाईन गेमवर 39 रुपये लावले. सकाळी तो या गेममध्ये 39 रुपये जिंकला.

 रात्री झोपताना 39 रुपये गुंतवले सकाळी उठल्यावर मोबाईलमध्ये आला 4 कोटींचा SMS; एका रात्रीत नशिब पलटले

Dream 11 App Winner Kaushambi: किती काही झाले तरी नशिबात असतं ते मिळतचं असे अनेक जण बोलतात. असचं एका तरुणाचे नशिब एका रात्रीत पलटले आहे. या तरुणाने रात्री झोपताना ऑवलाईन गेमवर 39 रुपये गुंतवले म्हणजेच या खेळावर त्याने 39 लावले. सकाळी उठवल्यावर तो या गेममध्ये 4 कोटी रुपये जिंकला. मोल मजुरी करणारा तरुण एका रात्रीत मालामाल झाला.  

मंगल सरोज असे या तरुणाचे नाव आहे.  उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मंगल सरोज याच्या आयुष्यात चार महिन्यांपूर्वी मोठा चमत्कार घडला. चैल तहसीलमधील घासी राम का पुरवा गावातील रहिवासी मंगलने एप्रिल महिन्यात ड्रीम 11 वर 39 रुपये लावले. तो या गेममध्ये 4 कोटी रुपये जिंकला. प्लायबोर्ड कामगार मंगल हापूरमध्ये काम करतो. 29 एप्रिल रोजी पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यातील सामन्यात 39 रुपये लावले होते. 

ड्रीम 11 App वर पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आयपीएल सामन्यावर त्याने 39 रुपयांची बेट लावली.  मंगल सरोजचे नशीब चमकले. त्याने तयार केलेल्या संघाने शानदार कामगिरी केली. या गेममध्ये  मंगलने 4 कोटी रुपये जिंकले. सकाळी त्याला 4 कोटी रुपये जिंकल्याचा मेसेज आला. मंगल सरोज फार शिकलेला नाही, तो फक्त पाचवीपर्यंतच शिकला आहे. त्याचे कुटुंब खूप गरीब आहे. आजही तो  कच्च्या घरात राहतो.  त्याचे लग्न 2014 मध्ये नौबस्ता गावात झाले होते, त्याला तीन मुले आहेत. ऑलाईन गेम मध्ये 4 कोटी जिंकल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले आहे. 

सरोजच्या विजयाची  चर्चा संपूर्ण परिसरात सपरली होती. गावातील लोकांनी त्याचे अभिनंदन केले.  मंगलचे वडील सुखलाल सरोज दुसऱ्यांच्या जमिनीवर शेती करतात. त्यांना सहा मुलगे आणि दोन मुली आहेत. कुटुंब गरिबीत जगत आहे. दोन मुली विवाहित आहेत. मंगलच्या विजयाने कुटुंबात आनंद आला आहे. 

 

Read More