Marathi News> भारत
Advertisement

खुशखबर : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला ब्रेक

 राजधानी दिल्ली सहीत मोठ्या चार शहरांमध्ये पेट्रोल डीझेलच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नाहीत.

खुशखबर : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला ब्रेक

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींना ब्रेक लागला आहे. राजधानी दिल्ली सहीत मोठ्या चार शहरांमध्ये पेट्रोल डीझेलच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नाहीत. इंडियन ऑईल (IOC) च्या वेबसाईटनुसार सोमवारी दिल्लीमध्ये पेट्रोल 72.84 रुपये, मुंबईत 78.42 रुपये, कोलकातामध्ये 74.87 रुपये आणि चेन्नईमध्ये 76.61 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलची किंमत दिल्लीमध्ये 66.11 रुपये, मुंबईत 69.19 रुपये, कोलकातामध्ये 67.85 रुपये आणि चेन्नईमध्ये 69.80 प्रति लीटर आहे. 

fallbacks

एक दिवस आधी पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या किंमतीत घट पाहायला मिळत होती. देशभरात रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. यांच्या या दरात बदल न होण्याची वेळही अनेकदा येते. सरकारी तेल कंपन्या किंमतींचे आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोल-डिझेल किंमतींचे परिक्षण केल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवतात.

fallbacks

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर अभ्यास करते आणि दर जाहीर करते. पेट्रोल डिझेलचे परदेश मुल्य, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑईलची किंमत या आधारावर पेट्रोल डिझेलच्या किंमती बदलतात. या किंमतींच्या आधारावर पेट्रोल दर आणि डिझेल दर रोज ठरवण्याचे काम या तेल कंपन्या करतात. 

Read More