How to check EPFO Balance: नोकरदार वर्गासाठी दर महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीलाच खात्यात जमा केली जाणारी रक्कम अर्थात पगार अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आर्थिक गणितांमध्ये केंद्रस्थानी असणाऱ्या या पगारातून काही रक्कम ही PF स्वरुपात कापली जाते. देशातील कोट्यवधी नागरिकांच्या पगारातून ही रक्कम कापली जात असून त्यातील अनेकांसाठीच आनंदाची बातमी आहे.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अर्थात (EPFO) च्या वतीनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी घोषित करण्यात आलेलं 8.25 टक्के व्याज खातेधारकांच्या खात्यावर जमा करण्यात आलं आहे. जवळपास 97टक्ते खातेधारकांच्या खात्यात आतापर्यंत ही रक्कम जमा झाली असून, केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांच्या माहितीनुसार ईपीएफओकडून या आठवडाअखेरीपर्यंत FY 2024-25 साठीचं निर्धारित व्याज सर्व सदस्य खातेधारकांच्या खात्यावर जमा केलं जाईल.
दरवर्षी केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ईपीएफओकडून कोट्यवधी खातेधारकांना त्यांच्या वाट्याचं व्याज दिलं जातं. यंदाच्या वर्षी 22 मे 2025 रोजी शासनानं 8.25 टक्के व्याजदराला मान्यता देण्यात आली होती. ज्यानंतर सदरील विभागानं या तरतुदींसाठी आवश्यक ती तयारी करत 6 जूनपासून खाती अपडेट करण्यास सुरुवाच केली. मांडविय यांच्या माहितीनुसार या प्रक्रियेमध्ये 13.88 लाख संस्थांमधील 33.56 कोटी सदस्यांची खाती या प्रक्रियेत अपडेट केली जाणं अपेक्षित होतं. ज्याअंतर्गत आता 8 जुलैपर्यंत 13.86 लाख संस्थांच्या 32.39 कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
EPFO कडून काही खात्यांवर व्याजाची रक्कम अपडेट करण्यात आली असून, काही खात्यांसाठी ही प्रक्रिया सुरूही आहे. 8.25 टक्क्यांनुसार ही व्याजाची रक्कम खात्यांमध्ये जमा करण्यात येत असून ती तपासून पाहण्यासाठी खालील पायऱ्या वापरा....