Marathi News> भारत
Advertisement

Government Schemes | दरमहा फक्त 28 रुपयांत 4 लाख रुपयांचा फायदा; भन्नाट सरकारी योजना

 कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये विम्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील खुपच कमी प्रीमियमवर विम्याची सुविधा देत आहे. 

Government Schemes | दरमहा फक्त 28 रुपयांत 4 लाख रुपयांचा फायदा; भन्नाट सरकारी योजना

नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये विम्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील खुपच कमी प्रीमियमवर विम्याची सुविधा देत आहे. ज्यामुळे समाजातील सर्व घटक याचा फायदा घेऊ शकतील. याबाबतच केंद्र सरकारच्या दोन भन्नाट योजना आहेत. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना(PMSBY)आणि पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजना(PMJJBY)जे तुम्हाला 4 लाख रुपयांपर्यंत विमा कवर देते.

4 लाख रुपयांपर्यंत फायदा घेण्यासाठी तुम्हाला या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही थोडे पैसे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी गुंतवणूक केले. तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. दोन्ही योजनांसाठी तुम्हाला वर्षाला फक्त 342 रुपये द्यावे लागतील.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY)
या योजनेचा लाभ 18 ते 70 वर्षापर्यंतचे लोक उठवू शकतात. या योजनेचे वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. पीएमएसबीवाय पॉलिसीचा प्रीमियम थेट बँकेच्या खात्यातून कापला जातो. पॉलिसी खरेदी करताना बँक खाते लिंक करण्यात येते.
पॉलिसीनुसार विमा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास किंवा पूर्णतः अपंग झाल्यास 2 लाख रुपयांची रक्कम मिळते. तसेच अर्ध अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये मिळतात.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
पंतप्रधान जीवन ज्योती योजना (PMJJBY)साठी वार्षिक प्रीमियम फक्त 330 रुपये आहे. ही योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षाचे लोक घेऊ शकतात. या योजनेला दरवर्षी रिन्यु करणे गरजेचे असते. या पॉलिसी अंतर्गत 2 लाख रुपये विमा मिळतो. या दोन्ही टर्म इश्योरंस पॉलिसी आहेत. ज्यामध्ये एका वर्षासाठी विमा कवर मिळतो. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा विमा खरेदी केल्यानंतर कोणत्याही मेडिकल तपासणीची गरज नसते.

दोन्ही योजनांचा विमा कवर 1 जुन ते 31 मे पर्यंत मिळतो.

Read More