Marathi News> भारत
Advertisement

SBIमध्ये अधिकारी बनण्याची संधी; पदवीधर करु शकतात अर्ज

SBIने विविध राज्यात सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. 

SBIमध्ये अधिकारी बनण्याची संधी; पदवीधर करु शकतात अर्ज

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकने SBI सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी भरती सुरु केली आहे. एसबीआय सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी एकूण 3850 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी एसबीआयच्या ऑफिशियल वेबसाईट www.sbi.co.in वरुन अर्ज करता येऊ शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारिख 16 ऑगस्ट आहे. 

SBIने विविध राज्यात सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. संपूर्ण देशात 3850 जागा आहेत. त्यापैकी गुजरात 750, कर्नाटक 750, तमिळनाडू 550, तेलंगाना 550, मध्यप्रदेश 296, छत्तीसगढ 104, राजस्थान 300 आणि महाराष्ट्रात 517, गोव्यात 33 जागा आहेत.

कोणत्याही विषयात पदवीधर अर्थात ग्रॅज्युऐट झालेला उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतो. उमेदवाराला व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा - 30 वर्षे असून, एससी-एसटी प्रवर्गाला 5 वर्षे आणि ओबीसीसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. 

एसबीआयच्या सर्कल बेस्ड ऑफिसर पदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी आधी शॉर्टलिस्ट केलं जाईल. योग्य उमेदवारास इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल. शॉर्टलिस्ट करण्यासाठी लेखी परीक्षा (Written exam) घेतली जाऊ शकते. 

सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला 750 रुपये ऍप्लिकेशन फी भरावी लागेल. राखीव प्रवर्गासाठी अर्ज शुल्कामध्ये 100 टक्के सूट देण्यात आली आहे.

 

Read More