Marathi News> भारत
Advertisement

Gold Price Today | आजही सोने खरेदीची मोठी संधी; गुंतवणूकीकडे लागले अनेकांचं लक्ष

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या दरावरही परिणाम होत असतो

Gold Price Today | आजही सोने खरेदीची मोठी संधी; गुंतवणूकीकडे लागले अनेकांचं लक्ष

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या दरावरही परिणाम होत असतो. त्याप्रमाणे सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. 

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर प्रतितोळा 55 हजाराच्या पुढे गेला होता. त्या तुलनेत सोने अद्यापही मुंबईत 10 ते 9 हजाराने स्वस्त मिळत आहे. गुंतवणूक दारांचे सोन्याच्या दरांकडे नेहमी बारीक लक्ष असते.  त्यामुळे अजुनही गुंतवणूकदारांसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

सध्या लग्न समारंभाचा सिजन सुरू आहे. भारतीय लग्नांमध्ये सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे सध्या सोने बाजाराचा ट्रेंड नक्की काय हे आपणांस माहिती हवे.

MCX मधील सोन्याच दर

मल्टी कमोडीटी एक्स्चेंज ( MCX)मध्ये आजचा सोन्याचा दर 47,011 प्रति तोळा इतका होता. कालच्या तुलनेत MCX मधील सोन्याचा दर जवळपास 300 रुपयांनी घसरला आहे.

MCX मधील चांदीचा दर

मल्टी कमोडीटी एक्स्चेंज ( MCX)मध्ये आजचा चांदीचा दर 68000 रुपये प्रति किलो इतका होता. तर कालच्या तुलनेत चांदीचे दर 1 हजार रुपयांनी घसल्याचे दिसून आले आहे.

मुंबईतील सोन्याचा दर

Gold (22Ct) 44,790 प्रतितोळा

Gold (24Ct) 45,790 प्रतितोळा

मुंबईतील चांदीचा दर आज 69 हजार इतका आहे.

----------

(वरील दर हे जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत. स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे दरात बदल होऊ शकतो)

Read More