Marathi News> भारत
Advertisement

नववधूनं केलेल्या गोष्टीचा वरदेवानं मंडपात असा घेतला बदला, पाहा व्हिडीओ

अरे देवा! वरमाला घालतायत की एकमेकांवर राग काढतायत व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा

नववधूनं केलेल्या गोष्टीचा वरदेवानं मंडपात असा घेतला बदला, पाहा व्हिडीओ

मुंबई: लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. काही वेळा मर्जी विरुद्ध लग्न होत असेल तर वादाचे किंवा जबरदस्ती लग्न होत असल्याचे व्हिडीओ देखील चर्चेत येत असतात. मात्र आता एक व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. याचं कारणही तसंच आहे. हा व्हिडीओ पाहून नेमका प्रश्न पडला आहे की हे दोघं वरमाला एकमेकांना घालत आहेत की एकमेकांवर राग काढत आहेत असा प्रश्न पडला आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी मुलगी सुरुवातील तोंड वाकड करत कशीबशी नवरमाला नवरदेवाच्या गळ्यात टाकते. ही वरमाला घालताना ती खूश नसते. तर नवरदेवही वरमाला टाकल्यासारखी तिच्या गळ्यात फेकून देतो. हा व्हिडीओ पाहताना दोनच गोष्टी वाटतात एकतर हे लग्न करणं दोघांच्याही जीवावर आलं असावं किंवा एकमेकांचा राग एकमेकांवर अशा पद्धतीनं काढत असावेत. 

नववधूने वरमाला घालताना जे केलं त्यामुळे काहीसा नाराज आणि रागवलेला नवरदेव जे करतो ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. तर अनेक युझर्सनी ह्या व्हिडीओच्या खाली एकमेकांसोबत लग्न करून खूश नसावेत अशी कमेंट केली आहे. तर दुसरा युझर म्हणतो की जबरदस्ती लग्न होत आहे का? असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.

Read More