Marathi News> भारत
Advertisement

Work From Home: लग्नाच्या दिवशीही 'वर्क फ्रॉम होम' करतोय नवरदेव, पाहा Photo

सध्या हा फोटो Social Media वर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात. 

Work From Home: लग्नाच्या दिवशीही 'वर्क फ्रॉम होम' करतोय नवरदेव, पाहा Photo

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यात लग्न समारंभपासून प्राण्यांचे अनेक व्हिडीओ असतात. सध्या लग्न समारंभ सुरु असल्यानं सोशल मीडियावर लग्नातले अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण या सगळ्यात कोरोनाच्या काळात (Covid) सुरु झालेला वर्क फ्रॉम होम हे अजूनही सुरु आहे आणि असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चक्क नवरदेव लग्नाच्या मंडपात लॅपटॉप घेऊन वर्क फ्रॉम होम करतोय. (Groom Working From Home In Mandap) 

हेही वाचा : Malaika Aroraसोबत अरबाजच्या गर्लफ्रेंडचं आहे असं नात? जॉर्जिया एंड्रियानीनं स्वत: केला खुलासा

हा फोटो व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंडपात बसलेल्या मुलाच्या विधी सुरु असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. दरम्यान, तो लॅपटॉप उघडून बसला आहे. हा फोटो कोलकाताचा आहे. मंडपात पंडीत जी, नवरदेव आणि नवरदेवाचे वडील दिसत आहेत. (Trending Photo) 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत श्रीमोयी नावाच्या नेटकऱ्यानं लिहिलं की, 'हा तिचा भाऊ आहे आणि त्याचं लग्न आहे. 'मात्र या काळात मुलगा लग्नाचे विधी सुरु असतानाच लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत आहे. यानंतर हा फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. 

हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, 'भाऊ आपण कोणत्या जगात राहत आहोत की लग्नाच्या दिवशीही सुट्टी मिळत नाही.' दरम्यान, दुसरा नेटकरी म्हणाला की, 'असं होऊ शकतं की तो फक्त थोडे काम करत आहे.' सध्या हा फोटो नक्कीच व्हायरल होत आहे. 

Read More