Marathi News> भारत
Advertisement

भरकटलेला 'विकास' स्थिर करणारा भाजपचा चेहरा

हे तेच हितू कनोडीया आहेत ज्यांनी, गुजरातमध्ये भरकटलेला विकास स्थिर करून भाजपला यश मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

भरकटलेला 'विकास' स्थिर करणारा भाजपचा चेहरा

नवी दिल्ली: गुजरातमध्ये भाजपचा जल्लोष सुरू आहे. या जल्लोषात एका चेहऱ्याची जोरदार चर्चा आहे. ज्याचे नाव आहे हितू कनोडिया. हे तेच हितू कनोडीया आहेत ज्यांनी, गुजरातमध्ये भरकटलेला विकास स्थिर करून भाजपला यश मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

गुजरात विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. भाजपला बहुमत मिळेल असे स्पष्ट संकेत मिळत असले तरी, भाजपच्या मताधिक्यात मात्र मोठी घट पहायला मिळत आहे. कॉंग्रेसचा जनाधा अधिक वाढला आहे. त्यामुळे विजयाकडे वाटचाल करत असलेला भाजप आणि ताकद वाढलेली कॉंग्रेस अशा दोन्ही पक्षांमध्ये जल्लोष पहायला मिळत आहे. दरम्यान, या जल्लोषात एका चेहऱ्याची मात्र, जोरदार चर्चा आहे. ज्याचे नाव आहे हितू कनोडिया. हे तेच हितू कनोडीया आहेत ज्यांनी, गुजरातमध्ये भरकटलेला विकास स्थिर करून भाजपला यश मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

भाजपच्या धोरणांमुळे 'विकास गांडो थयो छे' (विकास वेडा झाला आहे) असा प्रचार गुजरातमध्ये सुरू झाला. या प्रचाराचा कॉंग्रेसने खुबिने वापर करून घेतला. ज्यामुळे काही काळ भाजपलाही बॅकफूटला जावे लागले. मात्र, हितू कनोडिया दरम्यानच्या काळात एक नारा दिला. हा नारा होता 'हुं छू विकास, हुं छू विकास' (मी आहे विकास, मी आहे गुजरात). या नाऱ्याचा भाजपला चांगलाच फायदा झाला. भाजपला विकास वेडा झाला आहे या घोषणेला थेट आव्हान देता आहे.

हितू कनोडिया हा एक गुजराती अभिनेता असून, त्याने साबरकांठा जिल्ह्यातील इडर येथून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.  

Read More