Marathi News> भारत
Advertisement

चार मजली इमारत कोसळली; आठहून अधिक लोक अडकल्याची भीती

गुरूग्राममधील उलावास भागात आज सकाळी चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आठहून अधिक लोक दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

चार मजली इमारत कोसळली; आठहून अधिक लोक अडकल्याची भीती

नवी दिल्ली : गुरूग्राममधील उलावास भागात आज सकाळी चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आठहून अधिक लोक दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

इमारतीमध्ये काम चालू असतानाच अचानक इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या ओरडण्याच्या आवाजानंतर आजूबाजूच्या लोकांना इमारत कोसळल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. घटनास्थळी एनडीआरएफची तीन पथके दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. इमारत कशी कोसळली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती स्थानिक तसेच पोलिसांकडून मिळू शकलेली नाही.

गेल्या एक वर्षापासून दिल्ली-एनसीआरमध्ये इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार सुरू आहेत. नोएडातील शाहबेरी भागात झालेल्या अपघातानंतर अशा घटनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.  

Read More