Marathi News> भारत
Advertisement

नववर्ष २०१८ चं जगभरात जल्लोषात स्वागत

नवी स्वप्नं, नव्या आशा आणि नवी उमेद घेऊन वर्ष २०१८ चं आगमन झालं आहे.

नववर्ष २०१८ चं जगभरात जल्लोषात स्वागत

मुंबई : नवी स्वप्नं, नव्या आशा आणि नवी उमेद घेऊन वर्ष २०१८ चं आगमन झालं आहे.

fallbacks
Image: IANS

नववर्षाच्या शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत

तमाम भारतवासीयांसह संपूर्ण जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. नाच गाणी आणि फटाक्यांची आतशबाजी करत, प्रत्येकाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. 

fallbacks
Image: PTI

भूतकाळात जमा झालेल्या २०१७ वर्षामधल्या कडूगोड आठवणींची शिदोरी सोबत घेऊन, प्रत्येक जण मोठ्या उत्साहानं नव्या २०१८ वर्षामध्ये दाखल झाला आहे.

fallbacks
Image: PTI

याच सळसळत्या उत्साहानं नववर्ष २०१८ चं धुमधडाक्यात सर्वत्र स्वागत केलं गेलं.

fallbacks
Image: PTI

न्यूझीलंडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नववर्षाचं जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडमधल्या ऑकलंड शहरातल्या स्काय टॉवरवर नववर्षाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीनं करण्यात आलं. आधी काऊंटडाऊन आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये बरोबर रात्री बारा वाजताच्या ठोक्याला डोळ्यांचं पारणं फेडणारी रंगीबेरंगी आतशबाजी केली गेली.

त्यानंतर, सिडनीतील जगप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करत नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

Read More