नवी दिल्ली : हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना आहे. काल उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचे अमानुष कृत्य करण्यात आले होते. या घटनेवर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हाथरसमध्ये निर्दोष मुलीबरोबर जी अमानुष घटना घडली, तो आपल्या समाजावर कलंक आहे. हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारद्वारे मारले गेले आहे अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. गरिबाची मुलगी असणं अपराध आहे का? उत्तर प्रदेश सरकार काय करत होते असा सवाल त्यांनी केला.
हाथरस में मासूम लड़की के साथ जो हैवानियत हुई, वो हमारे समाज पर कलंक है।
— Congress (@INCIndia) September 30, 2020
हाथरस की निर्भया की मृत्यु नहीं हुई है, उसे मारा गया है- एक निष्ठुर सरकार द्वारा, उसके प्रशासन द्वारा, उत्तरप्रदेश सरकार की उपेक्षा द्वारा।
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी का वक्तव्य:- pic.twitter.com/1ER1DpCWYP
मी विचारू इच्छिते की, मुलगी होणे गुन्हा आहे का? गरिबाची मुलगी असणे अपराध आहे का? उत्तर प्रदेश सरकार काय करत होते. अनेक दिवस पीडित कुटुंबीयांचा न्यायासाठीचा टाहो ऐकला गेला नाही. संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वेळीच मुलीला योग्य उपचार नाही दिला गेला. आज एक मुलगी आपल्यातून गेली आहे. मी सांगू इच्छिते की हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू झाला नाही. तिला मारले गेले आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला आहे.