Marathi News> भारत
Advertisement

धोका कायम ! केरळात ११ जिल्ह्यांत पुन्हा 'रेड अॅलर्ट'

केरळमध्ये पावसाचा पुन्हा 'रेड अॅलर्ट' - अतिवृष्टीमुळे केरळातील जनजीवन पूर्ण ठप्प झाले आहे. त्यातच हवामान खात्याने केरळमधील ११ जिल्ह्यांमध्ये पुन्हा 'रेड अॅलर्ट' जारी केलाय. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. 

धोका कायम ! केरळात ११ जिल्ह्यांत पुन्हा 'रेड अॅलर्ट'

तिरुअनंतपूरम  : अतिवृष्टीमुळे केरळातील जनजीवन पूर्ण ठप्प झाले आहे. त्यातच हवामान खात्याने केरळमधील ११ जिल्ह्यांमध्ये पुन्हा 'रेड अॅलर्ट' जारी केलाय. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत ३.५ लोक बाधित झालेत. शेकडो लोक पुराच्या पाण्यात फसलेत. तर काहींनी घरांच्या छताचा आधार घेतलाय. पुढील  २४ तासात पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने धोका कायम आहे. १९ हजार ५१२ कोटी रुपयांचे आतापर्यंत नुकसान झाले आहे.

fallbacks

तिरुअनंतपूरम, कोल्लम आणि कासरगोड वगळता इतर ११ जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमधील नागरिकांना अतिवृष्टीचा फटका बसू नये म्हणून राज्य प्रशासन कामाला लागले आहे. तर हवामान खात्याने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने केरळमधील लोक हवालदिल झाले आहेत.

fallbacks

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी ८ पूरग्रस्त जिल्ह्यात एनडीआरएफच्या ५८ टीम युद्धपातळीवर काम करत आहेत. 

fallbacks

fallbacks

आतापर्यंत या आठही जिल्ह्यातील १७० लोकांना वाचवण्यात आलं असून ७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. तर ३.५ लाख लोकांना बाधित व्हावे लागले आहे. अत्यंत बिकट अवस्था असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.

fallbacks

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि प्रशासनाकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी केरळमध्ये किमान १९ हजार ५१२ कोटींचं नुकसान झाल्याचं विजयन यांनी मोदींच्या निदर्शनास आणून दिलं. तसेच देशातून अनेक राज्यातून मदतीचा ओघ सुरुच आहे. राजकीय पक्षांकडूनही आर्थिक मदत सुरु आहे.

fallbacks


केरल में भारी बारिश से एक की मौत, खोले गए पांच बांध

Read More