Marathi News> भारत
Advertisement

September Rain: का पडतोय धो-धो पाऊस? यंदा हिवाळ्यातही पडणार पाऊस? वाचा कारण

अंदाजानुसार, ही परिस्थिती वर्षाच्या शेवटपर्यंत टिकू शकते. यंदा हिवाळ्यातही (winter) पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

September Rain: का पडतोय धो-धो पाऊस? यंदा हिवाळ्यातही पडणार पाऊस? वाचा कारण

Rainfall Cause : सप्टेंबर (September) महिना संपत आला तरी, पावसाचा जोर कमी होताना दिसतं नाही आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये अजूनही पावसाने कहर केला आहे. मुंबईत (mumbai) शनिवारी (saturday) पहाटे पावसाने जोरदार बॅटिंग केली होती.  दिल्ली (Delhi) आणि लगतच्या शहरांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Life disrupted) झालं असून  अनेक भागात पावसाचं पाणी साचलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे लागले आहेत. 

काही ठिकाणी तर पावसामुळे रस्ते जलमय (Roads flooded) झाल्याचं पाहिला मिळाले आहे. अशा स्थितीत नागरिकांना ये-जा करतानाही त्रास होत आहे. मात्र, यादरम्यान प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे की, पावसाळा संपून गेला आहे, मग यंदा सप्टेंबर महिन्यातच एवढा पाऊस का पडतोय? या मागचं कारण नेमकं आहे तरी काय? 

सप्टेंबर महिन्यात पावसाची जोरदार बॅटिंग

यंदाचा पाऊस लोकांसाठी अडचणीचा ठरला आहे. सप्टेंबर महिन्यात एवढा पाऊस का पडतो, असा प्रश्न लोकांना पडला आहे. वास्तविक, देशातील अनेक भागांत पावसाचे स्वरूप बदलत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही जोरदार पाऊस झाला होता. (heavy rainfall september and imd say what reason NM)

सप्टेंबरमध्ये इतका पाऊस का पडतो?

सप्टेंबर महिन्यात पाऊस पडण्यामागे कोणतेही निश्चित कारण नाही, असंही हवामान तज्ज्ञांचं (Meteorologist) मत आहे. वेगवेगळ्या भागात पावसाची वेगवेगळी कारणं असू शकतात. गेल्या काही वर्षांपासून सप्टेंबरमध्ये पाऊस पडण्यामागे 'ला निना' (La Nina) हे कारण मानलं जात आहे. शिवाय, प्रशांत महासागराच्या (pacific ocean) मध्यभागी असलेल्या थंड हवामानामुळे मान्सूनचा पाऊस अधिक पडू लागतो. हवामान खात्यानुसार, सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक भागात 'ला निना' अशी स्थिती आहे. अंदाजानुसार, ही परिस्थिती वर्षाच्या शेवटपर्यंत टिकू शकते. यंदा हिवाळ्यातही (winter) पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

'ला निना' सिस्टम म्हणजे काय? (La Nina meaning)

पावसासाठी तापमान आणि दाब हे मुख्य कारणे असतात. जेव्हा जेव्हा उष्णता वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे हवा वरच्या दिशेने वाढते. त्यामुळे उच्च दाब क्षेत्राचे ढग तुलनेने कमी दाबाच्या क्षेत्राकडे सरकतात आणि पाऊस पडतो.

Read More