Marathi News> भारत
Advertisement

इराकमध्ये हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत

इराकमध्ये आयसीस या दहशतवादी संघटनेने 38 भारतीयांची हत्या केली. सोमवारी या हत्या झालेल्या भारतीयांचे मृतदेह भारतात आणले गेले. केंद्र सरकारने हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. पीएम मोदींनी मंगळवारी याची घोषणा केली.

इराकमध्ये हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत

नवी दिल्ली : इराकमध्ये आयसीस या दहशतवादी संघटनेने 38 भारतीयांची हत्या केली. सोमवारी या हत्या झालेल्या भारतीयांचे मृतदेह भारतात आणले गेले. केंद्र सरकारने हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. पीएम मोदींनी मंगळवारी याची घोषणा केली.

मंगळवारी केंद्रीय परराष्ट्र राज्‍य मंत्री व्ही.के सिंह मोसुलला भारतीयांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी गेले होते. 39 भारतीयांची मोसुलमध्ये आयसीसने हत्या केली होती. याची माहिती काही दिवसांपूर्वीच केंद्रीय परराष्ट मंत्री सुषमा स्‍वराज यांनी संसदेत दिली होती.

Read More