Marathi News> भारत
Advertisement

खोटी माहिती द्याल तर नोकरीला मुकाल, नोकरदारांसाठी हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

नोकरीसाठी  खोटी माहिती देणं तुम्हाला महागात पडू शकतं

खोटी माहिती द्याल तर नोकरीला मुकाल, नोकरदारांसाठी हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

High Court decision : तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी खोटी माहिती पुरवली असाल तर तुमची नोकरी जाऊ शकते. एका प्रकरणात निकाल देताना हायकोर्टानं नोकरदारांसाठी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलीयेत. त्यानुसार नोकरीसाठी खोटी माहिती देणं तुम्हाला महागात पडू शकतं. हायकोर्टानं नोकरदारांच्याबाबतीत काय म्हटलंय पाहूयात.

...तर तुमची नोकरी जाणार

- खोटी माहिती देणं, माहिती लपवणं हा गुन्हा

- पात्रतेवर प्रभाव टाकण्यासाठी असं कृत्य केलं जातं

- खोटी माहिती दिली तर कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ शकते

- कर्मचारी दोषी आढळला तर त्याला काढण्याचा कंपनीला अधिकार

- उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

- 2 CRPF जवानांच्या अपात्रतेच्या याचिकेवर हायकोर्टाची सुनावणी

एखाद्या पदासाठी आपण सर्वात जास्त लायक उमेदवार आहोत हे दाखवण्यासाठी खोटी माहिती दिली जाते, त्यामुळे अशा उमेदवारांना नोकरीवरुन काढायचा अधिकार आहे असा महत्त्वाचा निकाल हायकोर्टानं दिलाय. त्यामुळे नोकरीसाठी माहिती देत असाल तर सावधान. खोटी माहिती देणं तुम्हाला महागात पडू शकतं.

Read More