Marathi News> भारत
Advertisement

RBI मोठा निर्णय घेण्यास सज्ज? Home Loan आणखी स्वस्त होण्याचे संकेत; नवी आकडेवारी पाहाच

Bank Home Loan News : तुम्हीही गृहकर्ज काढलंय का? होम लोनचा हफ्ता फेडताना तुम्हालाही घाम फुटतोय? जाणून घ्या आरबीआय नेमका कोणता निर्णय घेणार?   

RBI मोठा निर्णय घेण्यास सज्ज? Home Loan आणखी स्वस्त होण्याचे संकेत; नवी आकडेवारी पाहाच

Bank Home Loan News : आर्थिक सुबत्ता आणि तत्सम परिस्थितीच्या प्रतिक्षेत असलेली अनेक मंडळी जेव्हा घर खरेदीच्या टप्प्यावर पोहोचतात तेव्हा इतकी मोठी रक्कम उभी करताना अनेकांचीच दमछाक होते. बँकांची कामं आणि त्यातही आर्थिक आधारासाठी घेतली जाणारी गृहकर्जाची मदत हा या संपूर्ण प्रक्रियेतील अतील महत्त्वाचा टप्पा ठरतो. येत्या काळात अशाच घर खरेदी प्रक्रियेतून जाणाऱ्या अनेकांनाच कर्जाच्या बाबतीत मोठा दिलासा मिळू शकतो आणि यास कारण ठरेल ते म्हणजे देशातील सर्वोत बँक संस्था असणाऱ्या रिझर्व्ह बँकेचं (RBI) चं एक धोरण. 

कर्जाचा हफ्ता येत्या काळात आणखी स्वस्त होणार असून, आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्यास अनुकूल असल्याचं म्हटलं जात आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या एका अहवालात नमूद केल्यानुसार डिसेंबरमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकीदरम्यान (RBI MPC) रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची आणखी कपात केली जाऊ शकते. यासोबतच 2025 या वर्षअखेरीस रेपो रेट 5.25 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई दरात झालेली घट पाहता पुढील दोन पतधोरण बैठकांमध्ये मात्र आरबीआय रेपो रेट स्थिर ठेवण्याचेच संकेत मिळत आहेत. 

अहवालात मांडण्यात आले महत्त्वाचे मुद्दे 

HSBC  च्या अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकांमध्ये आरबीआयकडून रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र डिसेंबरच्या बैठकित मात्र कर्जदारांना दिलासा देत रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटनं कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. 

हेसुद्धा वाचा : 'तर पृथ्वी आणि चंद्र...' संशोधनकर्त्यांकडून नवा उलगडा; अंतराळातील सर्वात मोठी घडामोड 

महागाईदरात घट 

अधिकृत आकडेवारीनुसार जून महिन्यात पभोक्ता मूल्य सूचकांक आधारित मुद्रानिती दर मे महिन्याच्या तुलनेत 2.8 टक्क्यांनी कमी होऊन 2.1 वर पोहोचला. खाण्यापिण्याच्या वस्तंमध्ये झालेली घट महागाई दर घटवण्यास कारणीभूत ठरली असून यामध्ये आणखी घट होईल असं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं आता आरबीआय ही सर्व परिस्थिती पाहता रेपो रेटमध्ये खरंच कपात करून कर्जदारांना दिलासा देते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More