Marathi News> भारत
Advertisement

लष्कर दिन : १५ जवानांचा मेडल देऊन सन्मान

भारत दरवर्षी 15 जानेवारीला लष्कर दिन साजरा करतो. आज भारताचा 70वा लष्कर दिन आहे.

लष्कर दिन : १५ जवानांचा मेडल देऊन सन्मान

नवी दिल्ली : भारत दरवर्षी 15 जानेवारीला लष्कर दिन साजरा करतो. आज भारताचा 70वा लष्कर दिन आहे.

भारताचे पहिले लष्कर प्रमुख जनरल केएम करिअप्पा यांच्या सन्मानात हा दिवस साजरा केला जातो. दिल्लीच्या कँट परेड ग्राउंडवर परेड केली जाते. याशिवाय लष्कराच्या सर्व मुख्यालयांमध्ये परेड आणि इतर कार्यक्रम होतात.
 
या दिनाच्या निमित्ताने लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नेवी चीफ सुनील लांबा आणि एयर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी अमर जवान ज्योतीवर शहिदांन श्रद्धांजली वाहिली.

आर्मी चीफ बिपिन रावत यांनी करिअप्पा ग्राउंडमध्ये परेडची सलामी घेतली आणि 15 जवानांचा मेडल देऊन सन्मान केला. ज्यामध्ये 5 मरणोत्तर मेडल होते.

Read More