Marathi News> भारत
Advertisement

कुटुंबाचा विरोध झुगारून लव्ह मॅरेज करणाऱ्या लेकीला लग्नानंतर 24 तासात संपवलं अन्...

Crime News : पुन्हा एकदा सैराट.... प्रेम करून लग्न करणाऱ्या पोटच्या लेकिचा बापानं घेतला जीव. मृतदेहाची विल्हेवाट लावत त्यानं केलेलं कृत्य पायाखालची जमीन सरकवणारं...  

कुटुंबाचा विरोध झुगारून लव्ह मॅरेज करणाऱ्या लेकीला लग्नानंतर 24 तासात संपवलं अन्...

Crime News : गुन्हेगारी विश्वातून आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं असून, यामुळं पुन्हा एकदा रक्ताची नातीसुद्धा अनेकदा सूडाच्या भावनेपुढं फिकी पडतात हीच दुर्दैवी बाब समोर आली आहे. प्रेमविवाह करणाऱ्या लेकीला जीवे मारत एका बापानं हेच दाखवून दिलं आणि साऱ्या देशालाच धक्का बसला. 

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामधील हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या विकृतीचा समाजातील सर्वच स्तरांतून कडाडून विरोध केला जात आहे. ऑनर किलिंगच्या या प्रकरणामध्ये इभ्रतीच्या नावावर वडील आणि मुलानं मिळून आपल्याच लेकीचा/ बहिणीचा जीव घेत नात्यांना काळीमी फासला आहे. अतिशय क्रुरपणे बापलेकाच्या जोडीनं लेकीची हत्या करत पुरावे मिटवण्यासाठी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. पोलिसांनी सदर घटनेची सविस्तर माहिरीत देत आरोपींना तातडीनं ताब्यात घेत या प्रकरणाची चौकशी केली असता समोर आलेल्या माहितीनं त्यांच्याही भुवया उंचावल्या. 

बिसरख पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या उत्तर प्रदेशातील चिपियाना गावातील हा प्रकार असल्याचं सांगण्यात येतं. जिथं 236 वर्षीय नेहा राठोड हिनं हापूड जिल्ह्यातील सूरज याच्याशी प्रेमसंबंधांतून लग्न केलं. पण, त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांचा मात्र विरोध होता. सूरजला भेटण्यापासूनही ते नेहाला सतत रोखत होते. पण, 11 मार्च रोजी हा विरोध झुगारून तिनं गाझियाबाद समाज मंदिर इथं जात सूरजशी लग्नगाठ बांधली. 

लेकीनं लग्न केल्याची माहिती मिळताच तिचे वडील भानू राठोड आणि भाऊ हिमांशू यांनी तिच्या हत्येचा कट रचला आणि नेहाच्या लग्नानंतर अवघ्या 24 तासांमध्ये म्हणजेच 12 मार्च रोजी तिची अतिशय निर्दयीपणे हत्या केली. गुन्ह्याचे पुरावे मिटवत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून त्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. 

हेसुद्धा वाचा : पहिल्यांदाच खासगी सावकारावर 'मकोका'; नाशिकमध्ये 20% नी वसुली, घरात घुसून विनयभंग अन्...

 

पोलिसांना ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तातडीनं तपास हाती घेतला आणि घटनास्थळाची पाहणी केली. ज्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही महत्त्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले. सदर प्रकरणी तपासादरम्यानच पोलिसांनी दोन मुख्य आरोपिंना ताब्यात घेत त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. 

Read More