Marathi News> भारत
Advertisement

Corona Virus: भारतात वेगाने पसरतोय कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, खबरदारी म्हणून आजपासून फॉलो करा 'हे' उपाय

Tips to Avoid Corona Virus: सिंगापूर, हॉंगकॉंगसह भारतातही नवा व्हेरिएंट सक्रिय झाला आहे. याची खबरदारी म्हणून आजपासून काही गोष्टी फॉलो करा.   

Corona Virus: भारतात वेगाने पसरतोय कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, खबरदारी म्हणून आजपासून फॉलो करा 'हे' उपाय

How to Avoid Corona Virus: सिंगापूर आणि हॉंगकॉंग सह भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा नवा सब-व्हेरिएंट JN.1 आला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेनं याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट अर्थात विशेष लक्ष ठेवण्याची गरज असलेला प्रकार म्हणून घोषित केलं आहे. भारतात मागील आठवड्यात एकूण 164 नवीन रुग्ण आढळले असून, त्यात केरळमधील 69, महाराष्ट्रातील 44 आणि तामिळनाडूमधील 34 रुग्णांचा समावेश आहे. सुदैवानं या रुग्णांमध्ये लक्षणं सौम्य असून, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासलेली नाही. 
भारतातील परिस्थिती नियंत्रणात 

भारतातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे पण परिस्थिती कधी बिकट होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खबरदारीचे उपाय करायला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असली, तरी भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच, काही महत्वाचे खबरदारीचे उपाय आजपासूनच सुरू करणं गरजेचं आहे.


कोरोनापासून बचावासाठी फॉलो करा 'हे' उपाय 

मास्कचा वापर करा

गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी जाताना चांगल्या दर्जाचा मास्क (N95 / KN95) वापरावा. 

सोशल डिस्टन्सिंग पाळा

शक्यतो गर्दी टाळा आणि इतरांपासून किमान 6 फूट अंतर ठेवा. बंद ठिकाणी तर ही सवय आवर्जून फॉलो करा. 

वारंवार हात धुवा

साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा. याशिवाय 60% पेक्षा अधिक अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर सतत वापरण्याची सवय लावा. 

गर्दीत जाणे टाळा 

अत्यावश्यक नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. घरात असाल तर चांगले व्हेंटिलेशन असेल असे बघा. 

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशा लक्षणांची चाहूल लागल्यास तात्काळ कोरोना टेस्ट करून घ्या आणि स्वतःला आयसोलेट करा.

प्रतिकारशक्ती महत्त्वाची 

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम अशा सवयी लावा. 

सरकारी सूचनांचे पालन करा

शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोविडसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन अवश्य करा. यामुळे बचाव होऊ शकतो.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More