Marathi News> भारत
Advertisement

लग्नासाठी हातात पैसे नाहीत! No Worry, असा कराल पैशांचा जुगाड

Wedding Loan: भारतात लग्नाचं बजेट लाखांच्या घरात असतं. यासाठी काही जण इतर लोकांकडून पैसे उधार घेऊनृ लग्नाचे कार्य पार पाडतात. जर तुमच्या घरीही लग्न असेल तर पैशाची काळजी करण्याची गरज नाही.

लग्नासाठी हातात पैसे नाहीत! No Worry, असा कराल पैशांचा जुगाड

Wedding Loan Interest Rate: भारतात तुळशी विवाह पार पडल्यानंतर लग्नाचा सीझन सुरु होतो. कारण आषाढी एकादशीनंतर चातुर्मासात विवाह आणि शुभ कार्य पार पडत नाही. त्यानंतर मोठ्या धुमधडाक्यात लग्न पार पडतात. भारतात लग्न सोहळ्यासाठी (Wedding Loan) लाखो रुपये खर्च केले जातात. काही जणांचा खर्च कोट्यवधींच्या घरात पोहोचतो. लग्नात इतका खर्च करणं (Wedding Budget) प्रत्येकाच्या आवाक्यात असतं असं नाही. या सोहळ्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडून पैशांची जमवाजमव सुरु होते. मात्र प्रत्येकवेळी नातेवाईक आणि मित्रमंडळी मदत करतील असं नाही. त्यामुळे लग्न सोहळ्यात कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण खरंच लग्नासाठी बँकेकडून कर्ज मिळतं का? जाणून घ्या प्रोसेस

असं घ्या Wedding Loan

भारतात लग्नासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकतं. या कर्जाच्या माध्यमातून लग्नातील खर्च पार पडू शकता. कर्ज देणाऱ्या बँका किंवा कंपन्या पर्सनल लोन वेगवेगळ्या कॅटेगरीत विभाजित करतात. यात वेडिंग पर्सनल लोनचा समावेश आहे. वेडिंग लोन आणि पर्सनल लोनमध्ये फारसा फरक नसतो. जर तुम्हाला लग्नाच्या खर्चासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर याबाबत माहिती करून घ्या. सर्वप्रथम कोणत्या बँका लग्नासाठी कर्ज देतात याची यादी पाहा. ही माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळेल. तसेच जवळच्या बँकेत जाऊन याबाबतची माहिती मिळवू शकता. कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी तुम्हाला 12 ते 60 महिन्यांचा अवधी दिला जातो. याशिवाय वयाच्या 21 व्या वर्षानंतर तुम्ही कर्ज घेऊ शकता. 

बातमी वाचा- Funny Thief: चोराचा चोरीदरम्यान विचित्र प्रकार! त्या रात्री असं घडलं की तुम्हीही पोट धरून हसाल

लग्नातील हा खर्च भागवू शकता

भारतात विवाहसोहळा महागडा पडू शकतो. त्यामुळे प्रत्येकाला आपली मिळकत आणि व्यवस्थापन करणं सोपं नसतं. विवाह कर्ज तुम्हाला तुमच्या लग्नाशी संबंधित सर्व खर्च भागवण्यास मदत करेल. याद्वारे, तुम्ही तुमचे वेन्यू फीस, दागिने खरेदी, खानपान इत्यादी खर्च भागवू शकता. 

Read More