How to lock Aadhaar card: आधार कार्ड. भारतात सरकारी काम असो किंवा इतर कोणतंही काम जिथं ओळखपत्रांची आवश्यकता आसते, तिथंतिथं आधार कार्डचा सर्रास वापर केला जातो. केंद्र सरकारच्या वतीनं देशातील नागरिकांसाठी जारी करण्यात आलेलं एक असं ओळखपत्र आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या बायोमेट्रीक डिटेलचा समावेश असतो. पण, हल्ली मात्र ही संपूर्ण प्रणाली सुरक्षित ठेवण्यात आलेली असतानाही सायबर फ्रॉडमध्ये मात्र याच आधार कार्डचा 'आधार' घेत फसवणूक केली जाते.
इथून पुढे मात्र ही प्रकरणं थांबणार असून, देशातील नागरिकांच्या आधार कार्डला आणखी सुरक्षितता प्रदान केली जाणार आहे. ज्याअंतर्गत आधार कार्ड लॉक करता येणार आहे. शिवाय हे करण्यासाठी तुम्हाला ई मित्र सेंटरलाही जाण्याची काहीही आवश्यकता भासणार नाही.
आधारसकार्ड लॉक करण्यासाठी सर्वप्रथम UIDAI myAadhaar या संकेतस्थळाला भेट द्या.
यानंतर 'लॉक/अनलॉक आधार' हा पर्याय निवडा.
Next हा पर्याय निवडल्यानंतर आधार वर्चुअल ID (VID), पूर्ण नाव, पिनकोड आणि कॅप्चा एंटर करा.
यानंतर OTP वेरिफाय होताच आधार बायोमेट्रिक्स लॉक होतील.
आधार कार्डशी लिंक असणारं फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फेस डेटा चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या कामांसाठी वापरला जाऊ नये यासाठी आधार बायोमेट्रीक लॉक सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. या सुविधेच्या मदतीनं तुमच्या परवानगीशिवाय ID वेरिफिकेशन, पैशांची देवाणघेवाण किंवा सिमकार्डही दिलं जाणार नाही. युजर/ भारतीय नागरिक कोणत्याही क्षणी बायोमेट्रिक्स लॉक किंवा अनलॉक करू शकतात. यासाठी ते UIDAI पोर्टल किंवा mAadhaar अॅपची मदत घेऊ शकतात. आधार कार्डशी संलग्न माहितीचा वापर करून अनेकांचीच फसवणूक करण्यात आल्याची माहिती आजवर अनेकदा समोर आली आहे. पण, आता मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं असून, त्याचा नागरिकांना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.