Marathi News> भारत
Advertisement

Annual Fees असणारं Credit Card फुकटात कसं वापरावं? कमाल फायद्याची 'ही' ट्रीक अनेकांच्या लक्षातही येत नाही

क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्या अनेकांनाच सुरुवातीला या गोष्टीचं फार अप्रूप वाटतं. पण, हेच क्रेडिट कार्ड वापरत असताना नंतर बसणारा आर्थिक फटका अनेकांना सहनही होत नाही. 

Annual Fees असणारं Credit Card फुकटात कसं वापरावं? कमाल फायद्याची 'ही' ट्रीक अनेकांच्या लक्षातही येत नाही

Credit Card Annual Fees : क्रेडिट कार्ड. आर्थिक अडीअडचणीच्या वेळी एक अशी गोष्ट जी पैशंची चणचण नाहीशी करते. या क्रेडिट कार्डचे बहुविध प्रकार असून, त्याचा जसजसा फायदा घेतला जाईल तसतसा त्यातून वापरकर्त्यांना फायदासुद्धा मिळत जातो. अशा या क्रेडिट कार्डच्या वापरासाठी users कडून वर्षभरात एक ठराविक रक्कम आकारली जाते. Annual Fees च्या स्वरुपात आकारल्या जाणाऱ्या या किमतीवरूनही अनेकजण कपाळावर हात मारतात. कारण या वाढत्या खर्चाचा भार कोणाला नको हवा असतो. 

Annual Fees सुद्धा चुकवता येते... 

बहुतांश क्रेडिट कार्ड कंपन्या स्पेंडिंग लिमीट सेट करतात. जर एखादा युजर वर्षभरात ही रक्कम खर्च करतात तर, त्यांची वार्षिक फी माफ केली जाते. उदाहरणार्थ, वार्षिक फी 1000 रुपयांची असल्यास बँकेकडून  ₹1,00,000 खर्च केल्यास ही फी माफ होते. थोडक्यात वर्षभरात जर खर्च करण्याची मर्यादा ओलांडल्यास बँक आपोआपच Annual Fees ची अट शिथिल करते. 

प्रत्येक बँकेची Waiver Limit वेगळी असते. बँकेनुसार ही मर्यादा कमीजास्त होत असते. अशा वेळी महत्त्वाची बाब म्हणजे कमीत कमी Waiver Limit असणारं कार्ड निवडल्यास ते फायद्याचं ठरतं. काही कार्ड Zero Annual Fee असणारेही असतात जे सुरुवातीपासूनच कोणत्याही फीशिवाय वापरता येतात. 

Annual Fee माफ करण्यासाठी कोणताही वायफळ खर्च करण्याऐवजी महत्त्वाच्या खर्चांसाठी क्रेडिट कार्डचा वापर करावा. उदाहरणार्थ, किराणा, मोबाईल बिल, ऑनलाईन शॉपिंगसाठी कार्डचा वापर केल्यास  Waiver Limit सहजपणे पूर्ण होते. वर्षभरात क्रेडिट कार्डधारकांनी चांगला खर्च केल्यासही जर तुमची बँक वर्षभरासाठीची फी आकारतेय तर मात्र तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधणं अपेक्षित आहे.

हेसुद्धा वाचा : विमानात तुमच्या शेजारी मृतदेह तर नाही ठेवलाय? 'त्या' जोडप्याचा अनुभव वाचून दातखिळीच बसेल 

अनेकदा बँक ग्राहकांना वार्षिक फी माफीची सवलत देते. अनेक प्रसंगांमध्ये कार्डचा व्यवस्थित आणि मर्यादेपर्यंत वापर केला गेल्यास अगदी सहजपणे फी माफ होते. असं झालं नाही तर बँका त्याऐवजी ग्राहकांना Welcome Benefits च्या स्वरुपात Shopping Vouchers, Cashback, Bonus Points यांसारख्या सुविधाही देतात. थोडक्यात वार्षिक फीच्या रुपात पैसे वाचवता आले नाहीत तरी पर्यायी मार्गांनी फायदा तुमचाच. 

Read More