Marathi News> भारत
Advertisement

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अभ्यासक्रम होणार कमी

अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अभ्यासक्रम होणार कमी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. शाळा सुरु होऊ शकत नसल्याने शिक्षणावरही याचा परिणाम होत आहे. शाळा बंद असल्यामुळे, शिक्षणाची वेळही कमी झाली आहे, हे लक्षात घेता सीबीएसईने 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी 9वी ते 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभ्यासक्रमात मूळ संकल्पना राखून ठेवून, अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कमी केलेला अभ्यासक्रम बोर्ड परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी निर्धारित विषयांचा भाग असणार नाही. शालेय प्रमुख आणि शिक्षक मिळून विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांना कमी केलेल्या अभ्यासक्रमाबाबत समजावून सांगतील.

यासंबंधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट केलं आहे. सीबीएसई अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासाठी काही आठवड्यांपूर्वी अभ्यासक्रम कमी करण्याबाबत अनेक शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी जवळपास 1.5 हजारहून अधिक सूचना आल्या होत्या, असं पोखरियाल यांनी ट्विट करत सांगितलं.

 

Read More