Viral Video : लग्न होतं तेव्हा वधूच्या डोळ्यात आनंद आणि दु:ख असे दुहेरी अश्रू असतात. फक्त हा क्षण असतो जेव्हा एकीकडे नवीन संसाराची स्वप्न आणि ज्या घरात लहानाचे मोठं झालो त्याला सोडून जाण्याच दु:ख असतं. पण आयुष्याचा टप्प्यात कधीकधी असा क्षणही येतो तेव्हा जिथे आनंद आणि दुःख यांच्यातील अंतर फक्त हृदयाचे ठोके असते. असाच एक क्षण तिच्या आयुष्यात आला, जिथे क्षणात आनंदाचा क्षण दु:खात बदलला. लग्नाचा 25 व्या वाढदिवस सर्वत्र आनंदाचे वातावरण...डोळ्यासमोर गेल्या 25 वर्षातील चढ उतारासह छोट्या छोट्या आनंदाचे क्षण... सोबत पुढच्या वाटचालीत नवऱ्याची अशी साथ राहणार असा प्रेमाचा क्षण तिच्या आणि त्याचा डोळ्यात दिसून येत असतानाच...एका क्षणात होत्याच नव्हतं झालं.
बरेलीच्या वसीमच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस होता. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. या सोहळ्यात सर्व त्यांच्या प्रेमाचे साक्ष होते. नवरा बायको स्टेजवर नाच असताना अचानक तो वसीम खाली कोसळला. तिच्या डोळ्यासमोर क्षणात तिचं जग उद्धवस्त झालं. बायकोच्या डोळ्यात आनंद अश्रूती जागा दु:खाच्या अश्रूने घेतली. मुलांचे अस्वस्थ किंकाळ्या, नातेवाईकांचे अविश्वासू रूप, सर्वत्र फक्त दुःख पसरले होते. प्रेमाची साक्ष देणारा रंगमंच आता अकल्पनीय दुःखाचे प्रतीक बनला होता. उत्तर प्रदेशातील बरेलीमधील बूट व्यापारी वसीम यांच्या 25 व्या लग्नाच्या वाढदिवशी अचानक निधनाने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.
#UttarPradesh | Bareilly businessman collapses on stage, dies while dancing with wife on 25th anniversary
— The Times Of India (@timesofindia) April 4, 2025
Details here https://t.co/vzRFgJ7IjQ pic.twitter.com/vGUa1xpVXA
असं सांगितलं जात आहे की, बरेलीतील शहााबाद इथे रहिवासी असलेले 50 वर्षीय बूट व्यावसायिक वसीम सरवत आणि त्यांची पत्नी फराह यांनी त्यांच्या 25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त बरेलीतील पिलीभीत बायपास रोडवरील एका विवाह मंडपात एक उत्सव आयोजित केला होता. समारंभासाठी कार्डे व्यवस्थित छापण्यात आली होती आणि नातेवाईकांनाही या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. वसीम आणि फराहच्या लग्नाची 25 वर्षे साजरी करत होते. दोघेही पत्नी फराहसोबत स्टेजवर गेले आणि नाचले. नाचत असताना, आनंदाची पार्टी शोकात बदलली. वसीम स्टेजवर पडतो आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू होतो.
लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा होता. वसीम तो केकही कापू शकला नाही. असे सांगितलं जात आहे की जेव्हा वसीम लग्नाच्या लॉनमध्ये पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या पत्नीसह स्टेजवर नाचण्यास सुरुवात केली आणि हा अपघात झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये वसीम आणि फराह मोठ्या उत्साहाने नाचत आहेत. पण दोघांनाही कळले नाही की काही सेकंदात हा उत्सव त्यांच्या आयुष्यातील शेवटचा आनंद ठरणार आहे.
वसीम बेशुद्ध होऊन अशाप्रकारे पडल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्सवाच्या वातावरणात, संपूर्ण कुटुंब शोकात बुडाले होते. वसीमची पत्नी फराह शहरातील एका मोठ्या खाजगी शाळेत शिकवते. अशाप्रकारे तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती देखील अस्वस्थ आहे. कुटुंबातील सदस्यांनी ओल्या डोळ्यांनी वसीमला दफन केले. वसीम यांच्या मागे दोन मुलं आहेत.
ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात की ,अशा प्रकरणांमध्ये खरं कारण म्हणजे शरीरातील रक्त आणि हृदयाशी संबंधित विकारांची बराच काळ वेळेवर तपासणी न करणे. वैद्यकीय भाषेत याला कार्डियाक अरेस्ट म्हणतात, म्हणून जर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा रक्त तपासणीत काही असामान्यता आढळली तर ताबडतोब हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.