Marathi News> भारत
Advertisement

पतीने दारूच्या नशेत पत्नीला संपवलं; रात्रभर तिच्या मृतदेहासोबत...

दारूच्या नशेत पतीने पत्नीची हत्या केली आहे.

पतीने दारूच्या नशेत पत्नीला संपवलं; रात्रभर तिच्या मृतदेहासोबत...

दिल्ली : दिल्लीतील फतेहपूर बेरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत पतीने पत्नीची हत्या केली आहे. जेवणाच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये भांडण झालं आणि यानंतर मद्यधुंद पतीने पत्नीची हत्या केल्याचा खुलासा झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय. शिवाय या खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, 39 वर्षीय सोनाली तिचा पती 47 वर्षीय विनोद कुमार दुबे यांच्यासोबत सुल्तानपूर गावात राहत होती. 2008 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. कोरोनाच्या परिस्थितीमुळे विनोद बेरोजगार झाला होता. 

दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा पती-पत्नी या दोघांनी एकत्र मिळून दारू प्यायली. त्यानंतर पत्नीने जेवण बनवलं. विनोदने सोनालीला जेवण वाढण्यास सांगितलं, मात्र तिने जेवण दिलं नाही. या प्रकरणावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि यादरम्यान विनोदने उशीच्या सहाय्याने सोनालीचा गळा दाबला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला.

मुख्य म्हणजे, तो रात्रभर पत्नीच्या मृतदेहासोबत झोपला. यावेळी सकाळी नशा उतरल्यानंतर त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. यानंतर विनोदने त्याच्या मित्राला या घटनेची माहिती दिली. तर मित्राने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. यासोबतच एसीपी मेहरौली विनोद नारंग यांनी सांगितलं की, घटनास्थळी पोहोचल्यानंतर विनोद कुमारला अटक करण्यात आली असून सोनालीच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आलीये.

Read More