Extra Marital Affairs News: पती कामासाठी मुंबईत आला इथे एकट्या पडलेल्या पत्नीने केल असं काही की पतीच्या पायाखालची जमीनच हादरली. पती पुन्हा गावी परत गेल्यावर जे दृष्य दिसले ते पाहून तोही भांबावला. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशमधील संत कबीरमधील एका महिलेचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले. मात्र, लग्न झाल्या झाल्याच नवरा कामासाठी मुंबईबाहेर गेला. नवरा गावाबाहेर गेल्यानंतर एकट्या पडलेल्या महिलेचे तिच्या दिरासोबत तिची मैत्री झाली. त्यांच्यातील मैत्री इतकी पुढे गेली त्यांचे प्रेमसंबंध जुळले. एकदिवस दोघांनी हद्दच केली. दोघंही घरातून पळून गेले आणि लग्न करुन परतले. विशेष म्हणजे त्यांच्या या लग्नाला कुटुंबीयांनीदेखील संमती दिली. खुशबू असं महिलेचे नाव आहे तर तिच्या पतीचे नाव कल्लू असं आहे.
खुशबू आणि कल्लू यांच्या लग्नानंतर तो महिनाभरातच मुंबईला गेला. या दरम्यान खुशबू आणि अमित एकमेकांच्या जवळ आले. जेव्हा कुटुंबीयांना याबाबत कळलं तेव्हा ते दोघंही घरातून पळून गेले. मात्र तेव्हा त्यांचे नातेवाईक त्यांना परत घेऊन आले. मात्र अमित आणि खुशबू दोघंही लग्न करणार या अटीवर अडून राहिले. अखेर त्यांच्या कुटुंबीयांनीच त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. या विचित्र घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती.
कुटुंबीयांनी शहरातील एका मोठ्या हॉलमध्ये दोघांचे लग्न लावून दिले. कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक नेतेदेखील या लग्नासाठी उपस्थित होते. खुशबू आणि अमित यांच्या लग्नात सहभागी होण्यास तिचा पहिला पती कल्लू याने नकार दिला. कल्लूने कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास आणि नातं ठेवण्यास नकार दिला होता. या घटनेची सध्या एकच चर्चा आहे. लोक या अनोख्या लग्नाची चर्चा करताना दिसत आहेत. काही लोक या लग्नाला अवैध म्हणत आहेत तर काहींनी हे योग्य असल्याचं म्हटलं आहे.