Marathi News> भारत
Advertisement

नवरा-बायकोचे नाते आई-मुलामध्ये बदलले, सूनेचा जडला सासऱ्यावर जीव; केले लग्न

एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे लग्नानंतर (Marriage) पत्नीने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि तिच्या सासऱ्याशी (Father In Law) लग्न केले. 

नवरा-बायकोचे नाते आई-मुलामध्ये बदलले, सूनेचा जडला सासऱ्यावर जीव; केले लग्न

मुंबई : उत्तर प्रदेशमधील बदायूं (Badaun) जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे लग्नानंतर (Marriage) पत्नीने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि तिच्या सासऱ्याशी (Father In Law) लग्न केले. पहिल्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. परंतु हे प्रकरण नंतर न्यायालयात गेले. न्यायालयाने लग्नाचा ठोस पुरावा पाहिल्यानंतर म्हणजेच कागदपत्रांवर कायद्याचा शिक्का असल्याचे पाहून त्या दोघांना सोडून देण्यात आले.

लग्नाच्या वेळी नवरा होता अल्पवयीन 

वास्तविक या प्रकरणात लग्नाच्या वेळी नवरा अल्पवयीन होता. ती तिच्या स्वत:च्या इच्छेनुसार सासऱ्यासोबत गेली. नंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केले. या लग्नानंतर मुलाने (पहिला पती) काही दिवसांपूर्वी बिसौली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माझे लग्न 2016मध्ये वजीरगंज परिसतील एका मुलीशी झाले होते. आम्ही दोघे वर्षभर एकत्र राहिलो. पुढच्या वर्षी पत्नी माझ्या वडिलांसोबत कुठेतरी गेली. त्यानंतर दोघांचा सतत शोध घेत होतो. मला अलीकडेच कळले की दोघे जण चंदौसी येथे राहत आहेत.

यासाठी नवऱ्यापासून घेतला घटस्फोट 

पोलिसांनी सांगितले की सुमितला जुगार आणि दारूचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यापासून दूर राहू लागली होती. सुमित देखील आपल्या पत्नीपासून वेगळा राहू लागला. त्याच्या वाईट सवयीमुळे त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला. मात्र, सुमितला आपल्या वडिलांनी आपल्या पत्नीबरोबर लग्न केले होते याची माहिती होती. परंतु तो त्याच्या पालनपोषण आणि खर्चाची मागणी करत होता. जेव्हा त्यांच्यात वाद वाढला, त्यावेळी पंचायत झाली. परंतु कोणताही निकाल लागला नाही.

अशाप्रकारे खटला सुरू झाला

'न्यूज 18'च्या वृत्तानुसार बदायूं येथे राहणाऱ्या 45 वर्षीय देवानंद यांच्या पत्नीचा 2015 मध्ये मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय 39 वर्षे होते. जेव्हा कुटुंबाने दुसरे लग्न करण्यास आणि संसार पुन्हा करण्यास सांगितले तेव्हा त्याने 15 वर्षांच्या मुलगा सुमितचे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पुढच्या वर्षी म्हणजेच 2016 मध्ये सुमितचे लग्न लावून दिले. लग्नानंतर सहा महिन्यांनंतर सुमित आणि त्याची पत्नी यांच्यात वाद होऊ लागलेत. त्यानंतर दोघांमध्ये अंतर वाढत गेले. दरम्यान, सुमितच्या पत्नीचे तिच्या सासऱ्यांशी जवळीक वाढत गेली.

संपूर्ण गावाला ही माहिती समजली

ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून या घटनेबद्दल माहिती नव्हती. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी सांगितले की, सुमितच्या पत्नीने त्याच्या वडिलांशी लग्न केले आहे. त्या मुलाला आई नाही. तो मजुरीचे काम करतो. त्याला एक बहीण असून तिचे लग्न झालेले आहे. तिला एक लहान भाऊ आहे, जो काकांकडे राहतो. यापूर्वीही त्यांच्या घरात वाद झाला होता. पण याक्षणी पती-पत्नीमधील नातं आता आई-मुलामध्ये रूपांतरीत झाले आहे, याविषयी मोठी चर्चा सुरु आहे.

Read More