Marathi News> भारत
Advertisement

Video: "मी 2 तासांपूर्वी त्याच फ्लाइटमध्ये होतो, त्याच वेळी..." अपघातग्रस्त झालेल्या विमानाने प्रवास केल्याचा एका व्यक्तीचा दावा

Ahmedabad Plane Crash: दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या एका प्रवाशाने दावा केला आहे की, ज्याच्याच Boeing 787-8 विमानाने तो प्रवास करून उतरला, त्याच विमानाचा काही तासांतच मोठा अपघात झाला. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असताना दुर्घटनेचा शिकार झालं.  

Video:

Ahmedabad Plane Crash: आकाश वत्स नावाच्या एका व्यक्तीने जे विमान क्रॅश झाले होते त्याच एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ( Air India Boeing 787-8) विमानाने त्याने काही तासाआधी प्रवास केल्याचे सांगितले आहे. त्याने एक व्हिडीओही शेअर केला आहे. उद्योजक आकाश वत्सा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं, “मी ज्या विमानात प्रवास केला, तेच विमान दोन तासांनी अपघातग्रस्त झालं. त्यांनी दिल्ली ते अहमदाबाद (DEL-AMD) असा प्रवास केला होता. विमानात काही विचित्र गोष्टी जाणवल्या होत्या. मी त्यावेळी एक व्हिडीओही काढला होता, @airindia ला टॅग करून पोस्ट करायचा विचार करत होतो. मला अजूनही बरीच माहिती द्यायची आहे.”

वत्सा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रवाशांचा अस्वस्थ चेहरा, विमानातील बंद एसी आणि बंद पडलेली इन-फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टीम स्पष्ट दिसत आहे. 

हे ही वाचा: पायलटला आकाशात मार्ग कसा समजतो? जाणून घ्या 

 

“आमचं विमान टेकऑफसाठी सज्ज होतं, पण एसी अजिबात चालू नव्हता. लोक घामाघूम होते. स्क्रीनही बंद होत्या. लाईट्स सुद्धा लागत नव्हते. हीच सेवा तुम्ही देत आहात?” असा सवाल वत्सा यांनी व्हिडीओत केला आहे.

त्यांची ही पोस्ट अवघ्या दोन तासांत चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की, परतीचा प्रवास त्यांनी एअर इंडियामधून केला नाही.

 

 

काय घडलं नेमकं Boeing 787-8 विमानाचं?

एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनकडे जाणारं AI171 हे विमान, दुपारी 1.39 वाजताच्या सुमारास टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच मेघाणीनगर भागात कोसळलं. या अपघातानंतर परिसरात मोठा धूर आणि आगीचे लोट दिसून आले.

हे ही वाचा: विमानात 200 प्रवासी अन् अचानक बेशुद्ध पडला पायलट, पुढे काय झालं? जाणून घ्या

 

एअर इंडिया (Air India) ने अधिकृतपणे अपघाताची कबुली दिली आहे. “AI171 फ्लाइट जी अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी रवाना झाली होती, ती आज दुपारी अपघातग्रस्त झाली. या Boeing 787-8 विमानात एकूण 242 प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, एक कॅनडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होत,” असं एअर इंडियाने म्हटलं आहे.

हे ही वाचा: 137 प्रवासी, 32 तास आकाशात फिरत राहिले फ्लाइट... काळजाचा ठोका चुकवणारी घटना

 

घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अनेक जखमींना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Read More