सध्या रीलचा जमाना असून फक्त मुलं किंवा तरुण नाही तर ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचं वेड लागलं आहे. रीलचं हे वेड एखाद्या क्षेत्रापुरतं मर्यादित राहत नसून, जवळपास प्रत्येक क्षेत्रात पोहोचलं आहे. विशेष म्हणजे अनेक पोलीस कर्मचारीही हे रील करताना दिसतात. पोलीस कॉन्स्टेबल, अधिकारी चक्क वर्दीवर पोलीस ठाण्यात रील शूट करत आहेत. अशातच मध्य प्रदेशातील रीवा येथेली एका महिला पोलीस अधिकाऱ्याची रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं. अखेर पोलीस महानिरीक्षकांनी या व्हिडीओची दखल घेतली. तसं रीवा झोनच्या सर्व पोलीस अधिक्षकांसाठी निर्देश जारी केलं.
पोलीस महानिरीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या रील शूट करण्यावर आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यावर निर्बंध लावले आहेत. तसंच रील बनवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सगरा पोलीस ठाण्याच्या अधिकारी अंकिता मिश्रा यांची रील व्हायरल झाली होती.
बताते हैं कि मैडम का नाम अंकिता मिश्रा है और ये मध्य प्रदेश के रीवा में, पुलिस विभाग में सब इंस्पेक्टर के पद पर कार्य करती हैं।
किसी ने इनकी शिकायत कर दी कि ये reel वगैरा बनाती हैं।
अगर आपके अंदर प्रतिभा है,आप एक आकर्षक चेहरे के मालिक हैं, और अपनी ड्यूटी को सही से निभा रहे हैं… pic.twitter.com/HbuSiLHOz7
बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि माधुरी दीक्षित यांच्या 'आरजू' चित्रपटातील 'तेरे दिल में हम आ गये...' या रोमँटिक गाण्याच्या शब्दांवर पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी पोलीस स्टेशनच्या आत एक रील बनवली. ही रील सोशल मीडियावर व्हायरल होताच विविध प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली होती. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्स करत होते. काहींनी तर पोलिसातील नोकरी सोडून चित्रपटात हात आजमावा असा सल्लाही देऊन टाकला.
या व्हिडीओनंतर पोलिसांची खूप बदनामी झाली. लोक पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित करू लागले. त्यामुळे गौरव राजपूत (आयजी रेवा झोन) यांनी रील बनवण्यावर बंदी घातली आहे. जर कोणी पोलिसांच्या गणवेशात, शस्त्रासह, वाहनात, पोलिस स्टेशनमध्ये इत्यादी ठिकाणी रील बनवताना आढळला तर तो अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आदेशात लिहिलं आहं की, ''अनेकदा असं दिसून येतं की अनेक पोलिस त्यांच्या गणवेशात किंवा साध्या कपड्यात रील बनवतात आणि त्या व्हायरल करतात किंवा सोशल मीडियावर अपलोड करतात. पोलिसांसारख्या शिस्तबद्ध विभागात असताना असे करणारा कोणताही पोलिस शिस्तीविरुद्ध आहे आणि त्याच्या पदाच्या आणि प्रतिष्ठेच्याही विरोधात आहे. त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा देखील खूप वाईट होते, म्हणून रेवा, सिद्धी, सतना, मैहर सिंगरौली आणि मौगंज येथील सर्व पोलिसांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय कामाव्यतिरिक्त, सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट पाठवू नका. ज्यामुळे पोलिस विभागाची प्रतिष्ठा खराब होते. जर कोणताही पोलिस असे करेल तर तो स्वतः त्यासाठी जबाबदार असेल आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.''