Marathi News> भारत
Advertisement

आयआयटीचे विद्यार्थी परदेशी कंपन्यांचे लाडके !

आयआयटी पवईमध्ये नुकताच प्लेसमेंट सिझन पार पडला.

आयआयटीचे विद्यार्थी परदेशी कंपन्यांचे लाडके !

मुंबई : आयआयटी पवईमध्ये नुकताच प्लेसमेंट सिझन पार पडला.

परदेशी कंपन्यांची हजेरी

यावर्षीच्या प्लेसमेंट सिझनमध्ये अनेक नामवंत परदेशी कंपन्यांनी हजेरी लावली. बहुसंख्य कंपन्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना पसंती दाखवली. यात तब्बल एक हजारांहून अधिक ऑफर पदरात पाडून घेण्यात आयआयटी पवईचे विद्यार्थी यशस्वी झाले.  

गलेलठ्ठ पॅकेजेस

त्यातच मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ पॅकेजेस दिलेत. या दोन्ही कंपन्यांनी कोट्यवधींचे पॅकेज दिले आहेत. अमेरिकन कंपन्या यात आघाडीवर आहेत. 

अभियांत्रिकीचे विद्यार्थी सर्वात पुढे

या विद्यार्थ्यांना भारतातल्या आणि परदेशातल्या कार्यालयांसाठी निवडण्यात आले आहे. यावर्षी ३८ पेक्षा जास्त कंपन्यांनी या प्लेसमेंट सिझनमध्ये भाग घेतला होता. अभियांत्रिकी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी यात बाजी मारली.

Read More