Bride and her Families are Rejecting Grooms: आजकाल मुलांची लग्न न ठरणं खूपच अवघड झालं आहे असं तुम्ही ऐकलंच असेल. आधी लग्न करताना मुलं अटी ठेवायचे पण 'जमाना बदल गया है' असं म्हणत आता मुलीही अनेक अटी ठेवू लागल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वय वाढलेली मुलं लागणीची आस धरून बसली आहेत. मुली आणि त्याच्या कुटुंबियांच्या मागण्या अनेकदा विचित्र असतात. देशात अशी काही गावं आहेत जिकडे अगदी पूर्ण तरारून मुलांची लग्न ठरत नाहीयेत. आपल्याकडे हुंडा बंदी असूनही मुलं आणि त्यांचे कुटुंबीय मुलीकडच्यांना हुंडा देण्यासाठी तयार आहेत. पण तरी अनेक ठिकाणी मुलांची लग्न ठरत नाहीये आणि मोठ्या प्रमाणात त्या नाकारला सामोरे जावे लागत आहे. असेच एक विचित्र कारण सध्या समोर आलं आहे. जिथे हुंडा, नोकरी नाही तर भलत्याच कारणामुळे मुलांना लग्नासाठी नकार पचवायला लागत आहे.
इंडिया टुडेनुसार, मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे एका कारणामुळे मुली लग्न करून यायला तयार नाहीयेत. ते कारण म्हणजे गावात न येणार मोबाईचे नेटवर्क. होय, मोबाईल नेटवर्कचा अभाव केवळ दैनंदिन जीवनावर परिणाम करत नाही तर तरुणांच्या लग्नातही अडथळे निर्माण करत आहे हे दिसून येत आहे.
हे ही वाचा: महिला बँकेत पोहोचली, नाव आणि लॉकर क्रमांक सांगितला आणि हे ऐकताच मॅनेजरला फुटला घाम; कारण...
हे गाव कुरई ब्लॉकमधील नायगाव आहे. हे गाव पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेले वन गाव आहे. येथील लोकांकडे मोबाईल फोन आहेत, मात्र नेटवर्कच्या कमतरतेमुळे त्यांना फोनवर बोलण्यासाठी तीन किलोमीटर दूर जावे लागते. या अनोख्या समस्येमुळे गावातील अविवाहित तरुणांची संख्या या गावात वाढत जात आहे. या गावात एकही कुटुंब आपल्या मुलीचे लग्न करण्यास तयार नाही.