मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोलने 100 रूपयांचा आकडा पार केला. डिझेलच्या दरांत देखील सतत वाढ होत आहे. इंधनांच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत , शिवाय महिन्याचं गणित देखील बिघडलं आहे. आता त्यामध्ये अधिक भर पडणार आहे. पेट्रोल-डिझेल आणि LPG सिलेंडरनंतर आता CNG आणि PNGच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. CNGच्या किंमतीत 90 पैसे प्रति किलोग्रामने वाढ झाली आहे. ndraprastha Gas Limited (IGL) ने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
CNG retail price in Delhi revised from Rs 43.40/kg to Rs 44.30/kg w.e.f 8th July; PNG domestic price to be Rs 29.66 per SCM.
— ANI (@ANI) July 8, 2021
CNG retail price in Noida, Greater Noida & Ghaziabad revised from Rs 49.08/kg to Rs 49.98/kg w.e.f 8th July; PNG domestic price to be Rs 29.61 per SCM. pic.twitter.com/BJRXkVXU3g
IGLने दिलेल्या माहितीनुसार, CNGगॅसचे दर 43.40 रूपये होते तर आता त्यासाठी 44.30 रूपये मोजावे लागणार आहेत. तर दुसरीकडे PNGचे दर देखील वाढले आहेत. दिल्लीत PNGसाठी आता 29.66 रूपये मोजावे लागणार आहेत. हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत. दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये नवे दर लागू होणार आहेत.
याआधी GL ने CNG, PNG चे दर 2 मार्च 2021 रोजी वाढवले होते. तेव्हा PNGच्या दरात 91 पैसे तर CNG 70 पैशांनी वाढ केली. सतत होत असलेल्या दर वाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.