Marathi News> भारत
Advertisement

उद्या मोठी घडामोड घडणार? देशातील 4 राज्यात पुन्हा होणार मॉक ड्रिल, ऑपरेशन सिंदूरनंतर आता काय?

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या हेतूने भारताने 6-7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. 25 मिनिटांच्या या ऑपरेशनदरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली आहेत.   

उद्या मोठी घडामोड घडणार? देशातील 4 राज्यात पुन्हा होणार मॉक ड्रिल, ऑपरेशन सिंदूरनंतर आता काय?

भारतातील ४ राज्यांमध्ये उद्या मॉकड्रिल होणार आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जातील. पाकिस्तानच्या सीमेला लागून असणाऱ्या राज्यांमध्ये हे मॉक ड्रिल आयोजित केले जातील. भारताने पाकिस्तानविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनंतर हे मॉक ड्रिल केलं जात आहे. यादरम्यान लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला आहे. या चारही राज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 3300 किमी लांब सीमा आहे. जम्मू काश्मीरला लागून असणाऱ्या सीमेला LoC म्हणजेच नियंत्रण रेषा म्हटलं जातं. तर पंजाब, राजस्थान आणि गुजरातला लागून असलेल्या सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हटलं जातं. 

याआधीही केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलची घोषणा केली होती. पण 6-7 मेच्या रात्री भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांविरोधात कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानच्या आणखी 12 दहशतवादी तळांची यादी तयार करण्यात आली आहे. पीओके पासून पाकिस्तानच्या आतपर्यंत पसरलेली दहशतवादाची मूळं नष्ट करण्याचा भारताचा प्रयत्न असून, ऑपरेशनमागे हेच लक्ष्य आहे. 

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान आधीच घाबरलेला आहे. संपूर्ण देशात भितीचं वातावरण आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरसारख्या आणखी एका ऑपरेशनची पाकिस्तानला भीती आहे. भारताने आतापर्यंत फक्त नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील आणखी 12 दहशतवादी तळांना लक्ष्य केले जाऊ शकते.

यापूर्वी भारताने स्पष्ट केले होते की दहशतवादाची उर्वरित तळंदेखील नष्ट केले जातील. यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे. भारताच्या सीमावर्ती भागात हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क आहे. पाकिस्तानची दहशत आणि नियंत्रण रेषेवर होणारा गोळीबार पाहून लष्कराने काश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये नियंत्रण केंद्रे स्थापन केली आहेत.

दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले ते म्हणजे बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद. बहावलपूरमधील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आले.

Read More