उर्वशी खोना (प्रतिनिधी) दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकमधील 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल आहे. तर दुसरीकडे भारताने दहशतवाद्यांची नाकाबंदी करत पुन्हा एकदा दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाही लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएच्या तीन दहशतवाद्यांना संपवण्यात आलं आहे.
भारताने आता दहशतवाद्यांच्या विरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. पाकसोबत शस्त्रसंधी झाली असली तरी दहशतवादाविरोधात भारताची लढाई सुरूच आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आता भारताने ऑपरेशन केल्लर हाती घेतलं आहे. या ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा भारताना खात्मा केला. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यांत लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. यात टीआरएचा कमांडरही मारला गेला आहे. भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत या मोहिमेला ऑपरेशन केल्लर असं नाव दिलं.
हेही वाचा : अडीच लाख रुपये देणारी लोकप्रिय योजना मोदी सरकारने केली बंद; बाबासाहेबांच्या नावाने मिळायचा निधी पण...
- शाहीद कुट्टे, अदनान शफीसह तिघांचा खात्मा
- तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही
- शाहीद कुट्टे हा टीआरएफचा कमांडर
- केल्लर भागातील जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती
- त्यानंतर पोलीस आणि सैन्यदलाने संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांना घेरलं
- ऑपरेशन केल्लरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
पाक आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आता काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आलीय. त्यामुळे भारताने आता चारही बाजुंनी दहशतवाद्यांनी कामाबंदी केल्याचं पाहायला मिळतं आहे.