पाकला पाठिंबा देणं तुर्कीएला चांगलंच भोवणार आहे. व्यापारापाठोपाठ आणि जेएनयू विद्यापीठाने तुर्कीएच्या इनोनू विद्यापीठासोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जेएनयू विद्यापीठ देशासोबत आहे हे दर्शवण्यासाठी हा करार स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे तुर्कीएची मोठी अडचण होणार आहे.
- पाकला पाठिंबा देणं तुर्कीच्या अंगलट
- तुर्कीएची चारही बाजूंनी कोंडी
- व्यापारापाठोपाठ शैक्षणिक करारही स्थगित
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच आता तुर्कीए देशही चारही बाजूने अडकला आहे. पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देण्याच्या निर्णयावर तुर्कीएला आता पश्चाताप व्हायला सुरुवात झाली असेल. कारण व्यापार, पर्यटनापाठोपाठ आता शैक्षणिक क्षेत्रातही तुर्कीएला धक्का बसला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयूने तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार स्थगित केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या तुर्कीएतील विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कीएच्या अंगलट आलं आहे. जेएनयूने एक्स पोस्ट करून करार स्थगित केल्याची घोषणा केली आबे.
- 3 फेब्रुवारी 2025 रोजी जेएनयूचा तुर्कीच्या विद्यापीठासोबत करार
- 2 फेब्रुवारी 2028पर्यंत कराराची वैधता
- राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव करार स्थगित
- तुर्कीएच्या भारतविरोधी भूमिकेमुळे जेएनयूचा निर्णय
तुर्कीएवर भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सींनी बहिष्कार टाकला आहे. तुर्कीसोबतच्या सर्व व्यापा-यांवर भारतीय व्यावसायिकांनी बॉयकॉट केला आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडणार असणा-या तुर्कीएची मात्र खोड मोडत नाही. तुर्कीएचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी पाकच्या पंतप्रधानांना फोन करून पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवला आहे.
- ट्रॅव्हल्स एजन्सींचा बहिष्कार
- टूर पॅकेजेस आणि अनेक बुकिंग रद्द
- तुर्कीएच्या सफरचंदावर बहिष्कार
- मार्बल व्यावसायिकांकडून तुर्कीएचा बॉयकॉट
- तुर्कीएच्या 'TRT वर्ल्ड' अकाऊंटवर भारतात बंदी
- मुंबई विमानतळावरील ड्रॅगन पासची सेवा स्थगित
- तुर्कीएची कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द
सेलेबी कंपनीवर कारवाईमुळे कंपनीमध्ये काम करणारे 4000 मराठी मुलं बेरोजगार होणार आहेत. यासाठी शिवसेनेनं आंदेलन केलं. यापुढे ज्या कोणत्या कंपनीला कंत्राट दिलं जाईल त्या कंपनीनं या तरुण-तरुणींना कामावार ठेवावं अशी मागणी शिवसेनेच्या मुरजी पटेलांनी केलं आहे.
भारताने कायम तुर्कीएला अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला. तुर्कीएमध्ये झालेल्या भूकंपामुळे त्यांना सर्वात आधी मदत करणारा भारत देशच होता. मात्र तुर्कीएनं या उपकाराची परतफेड पाकिस्तानला शस्त्र पुरवून केलीये. त्यामुळे तुर्कीएला भारतीयांच्या संतापाला आणि बहिष्काराला सामोरं जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.