Job News : (Govt Jobs) सरकारी नोकरी, लिपिक पदाची नोकरी या आणि अशा कैक नोकऱ्या काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय होता. अर्थात सरकारी नोकरीची लोकप्रियता आजही कायम असली तरीही या नोकरीच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या नव्या संधीसुद्धा खुल्या झाल्या आहेत. अशाच एका प्रगतीशील क्षेत्राबाबत केंद्राकडूनच महत्त्वाची आकडेवारी जारी करत त्या माध्यमातून देशात येणाऱ्या परकीय चलनावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
पर्यटन मंत्रालयानं जारी केलेल्या अहवालानुसार 2023 मध्ये पर्यटन क्षेत्रातून परकीय चलनात 231927 इतकी मिळकत होती. 2024 मध्ये हाच आकडा 277842 कोटी रुपयांवर पोहोचला. यामध्ये येणाऱ्या काळात एकदोन नव्हे, तर तब्बल 8 ते 10 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा असून परिणामी ही वाढ 450000 कोटींच्या घरात असू शकते असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशात पायाभूत सुविधांचा होणारा विकास पाहता पर्यटन विकासाला यामुळं बरीच चालना मिळाली आहे. किंबहुना 2030 पर्यंत एकट्या पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातूनच साडेचार लाख कोटींहूव अधिक रक्कम देशातील GDP चा एक भाग बनू शकते असं जाणकारांचं मत.
अमेरिका- 19.2 टक्के
ब्रिटन- 13.8 टक्के
कॅनडा – 7.6 टक्के
ऑस्ट्रेलिया – 4.6 टक्के
मलेशिया- 3.7 टक्के
जाणून आश्चर्य वाटेल पण, 2024 या एका वर्षात भारतात तब्बल 9657003 इतक्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली. 2023 आणि 2022 च्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे 19.80 आणि 28.35 टक्क्यांनी जास्त होतं.
हॉटेल, विमानसेवा, प्रवासी सेवा देणाऱ्या संस्था, अन्न प्रक्रिया या क्षेत्रांचा प्रत्यक्ष विकास होत आहे. तर, वेलनेस टुरिझम, Adventure ट्रॅव्हल, हेरिटेज ट्रॅव्हल, लक्झरी ट्रॅव्हल अशा क्षेत्रांचा विकास होत आहे. भारतात फक्त परदेशी पर्यटकांचाच ओघ वाढला नसून, देशांतर्गत पर्यटन सुविधासुद्धा वाढल्या असून, पुढच्या पाच वर्षांमध्ये आयटी आणि बँकिंग अशा क्षेत्रांसोबतच पर्यटन क्षेत्रातसुद्धा करिअरसह रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील कारण हे क्षेत्र ग्राहककेंद्रीत आहे असं जाणकारांचं मत.