Indian Navy : भारतीय नौदलानं आजवर अनेक नवनवीन विक्रम रचले असून, कायमच साहस आणि शौर्याला केंद्रस्थानी ठेवत शत्रूला आव्हान दिलं आहे. अशा या भारतीय नौदलाला आता पहिल्या महिला फायटर पायलट अर्थात पहिल्या महिला वैमानिक मिळाल्या आहेत ज्यांच्या खांद्यांवर घातल लढाऊ विमानाची जबाबदारी असेल.
नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सब लेफ्टनंट आस्था पुनिया असं या महिला नौदल अधिकाऱ्यांचं नाव असून, या पदी नियुक्त होणाऱ्या त्या देशातील पहिल्याच महिला नौदल अधिकारी ठरल्या आहेत. भारतीय नौदलाच्या काही विमानं आणि स्ट्रीम हेलिकॉप्टरमध्ये महिला वैमानिक तैनात आहेत. मात्र आस्था यांच्यावर लढाऊ विमानाची जबाबदारी असेल.
सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवरून नौदलानं यासंदर्भातील माहिती देत लिहिलं, ‘नेवल एविएशनमध्ये एक नवा अध्याय जोडण्यात आला आहे. भारतीय नौदलानं 3 जुलै 2025 रोजी इंडियन नेवल एअर स्टेशनमध्ये द्वितीय बेसिक हॉक कन्वर्जन कोर्सच्या समारोपासोबत एक मैलाचा दगड स्थापित केला. लेफ्टनंट अतुल कुमार ढुल आणि एसएलटी आस्था पुनिया यांना रियर एडमिरल जनक बेवली, एसीएनएस (वायु) यांनी 'विंग्स ऑफ गोल्ड' हा पुरस्कार दिला’.
A New Chapter in Naval Aviation#IndianNavy marks a historic milestone with the graduation of the Second Basic Hawk Conversion Course on #03Jul 2025 at @IN_Dega.
— SpokespersonNavy (@indiannavy) July 4, 2025
Lt Atul Kumar Dhull and Slt Aastha Poonia received the prestigious 'Wings of Gold' from RAdm Janak Bevli, ACNS (Air).… pic.twitter.com/awMUQGQ4wS
सदर पोस्टच्याच मदतीनं नौदलाकडून आस्था पुनिया या नेवल एविएशनमधील फायटर स्ट्रीममध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक ठरल्याचं जाहीर केलं. आस्था या नेमकं कोणतं लढाऊ विमान उडवणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरीही काही खास एअरक्राफ्ट नौदलाच्या सेवेत असून आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून ही लढाऊ विमानं आकाशात झेपावत शत्रूवर मारा करण्यास समर्थ आहेत. नौदलाकडे मिग 29 ही लढाऊ विमानं असून, त्यांची कॉम्बेच रेंज 722 किमी इतकी आहे तर, सामान्य रेंज 2346 इतकी आहे. यातून 450 किलोचे चार बॉम्ब, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रसाठाही नेता येतो.